Home सामाजिक लिव्ह इन रिलेशनशिप

लिव्ह इन रिलेशनशिप

341
0

आशाताई बच्छाव

IMG_20240203_213643.jpg

लिव्ह इन रिलेशनशिप

लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे एका पुरुषाने आणि स्त्रीने विवाह न करता एकमेकांसोबत राहणे.न्यायालयाने या रिलेशनशिपला मान्यता दिली आहे.यावर अजून कुठलाही कायदा अस्तित्वात आलेला नाही.पण खरंच लिव्ह इन मध्ये राहताना एकमेकांना समजून घेता येतं का?हा प्रश्न आजही महत्वाचा आहे.कधीही एकत्र राहणे, नाही पटलं तर सोडून देणे असं वागणं म्हणजे निकोप रिलेशनशिप आहे असं तर आपण नक्कीच म्हणू शकणार नाही.आपल्या समाजात आजही अशा रिलेशनशिपला चांगल्या नजरेने पाहिले जात नाही.खास करून अश्या रिलेशनशिप मध्ये असणाऱ्या स्त्रियांना खोचक नजरेने पाहणारी मंडळी समाजात खूप असतात.
आपण कौटुंबिक लोक आहोत.आपल्याकडे लग्नव्यवस्थेला खूप महत्त्वाचे स्थान आहे.लिव्ह इन मध्ये असलेले संबंध वाटतात तितके सोपे नक्कीच नाहीत.यात स्त्री-पुरूष कायद्याने सक्षम असायला हवेत.त्यांच्यात जर पती- पत्नीप्रमाणे रिलेशनशिप असतील तरच त्याला लिव्ह इन म्हणता येते.लिव्ह इन एक तात्पुरती व्यवस्था आहे.याचा शेवट कधीही होऊ शकतो.विवाहाचे बंधन सर्वात उत्तम आहे.आपल्या पूर्वजांनी लग्नाला उत्तम पर्याय मानला आहे.लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये स्त्री, पुरूष आपल्या मनमर्जीने जगतात.कारण ते कुठलीही जबाबदारी स्विकारायला तयार नसतात.हे चंगळवादाला प्रोत्साहन देणारे आहे.आपण बघतो की कितीतरी सेलिब्रिटीज अशा पध्दतीने राहतात.त्यांना कुठलीही जबाबदारी नको असते.आज एका सोबत राहायचे, कंटाळा आला किंवा पटले नाही की दुसऱ्या कुणाला तरी शोधायचे अशी यात भावना असते.किती वाईट आहे हा प्रकार!आजची मुले, मुली खूप शिकतात.चांगल्या पगाराची नोकरी मिळाली की त्यांना कशाचीच किंमत राहत नाही. कित्येक मुलींना लग्नानंतर घरात सासू- सासरे, नणंद , दीर नको असतात.अशावेळी त्यांना लिव्ह इन मध्ये राहणे सोपे वाटते.सध्या याचे प्रमाण वाढत आहे.लिव्ह इन आपली संस्कृती नाही.एखाद्याच्या भावनांशी खेळून नंतर त्याला सोडून देणे यात काय चांगले आहे? विवाहसंस्थेत एक गोष्ट चांगली आहे की काही गोष्टी एकमेकांच्या पटल्या नाही तरी भविष्याचा विचार करून निर्णय घेतले जातात.सहजासहजी वेगळे होण्याची शक्यता कमी असते.लिव्ह इन मध्ये असं कुठलच बंधन नसतं.विवाह म्हणजे समाजमान्य नातं.लिव्ह इनचे प्रमाण मोठ्या शहरांमध्ये जास्त बघायला मिळतं.आपल्या भारतीय समाजाला हे रिलेशनशिप कधीच रूचत नाही.कारण आपल्यावर झालेले संस्कार.काहींच्या मते हा त्यांच्या खाजगी जीवनाचा भाग आहे.पाश्चात्य देशांमध्ये या लिव्ह इनचे प्रमाण खूप जास्त आहे.या नात्याला पती-पत्नीचे नातं कधीच मानल्या जात नाही.या रिलेशनशिप मधील स्त्री-पुरूष पुढे लग्न करतीलच असेही काही नाही.आजही आपल्या समाजात घटस्फोटाचे प्रमाण कमी आहे.याला कारण म्हणजे घरच्यांचा घटस्फोटाला असलेला विरोध, समाजात आपली नाचक्की होईल अशी भिती असणे, मुलांच्या भविष्याचा विचार असणे इत्यादी.कित्येक महिलांना उत्पन्नाचे साधन नसते.अशावेळी त्या पूर्णपणे आपल्या नव-यावर अवलंबून असतात.लिव्ह इन कुठल्याही समस्येवर उपाय नाही.आपल्याकडे लिव्ह इन रिलेशनशिपला लफडं असं संबोधलं जातं.काही लग्न झालेली मंडळीसुध्दा दुसऱ्या कोणासोबत लिव्ह इन मध्ये राहतात.ही खरंच चिंताजनक बाब आहे.त्यामुळे अनेकदा संसाराची राखरांगोळी होते.यात कोणीही आनंदी राहू शकत नाही.
लिव्ह इन ही संकल्पना आपल्या देशासाठी सोयीची नाही.यासाठी कायद्यात अशा नात्याला बरखास्त करण्याची तरतूद हवी.आपण कितीही आधुनिक झालो तरी आपल्याकडे लिव्ह इनला समाज पूर्णपणे कधीच स्विकारू शकत नाही.आपली विवाहसंस्था वर्षानुवर्षे टिकून आहे आणि नेहमीच असणार यात काही वाद नाही.

लैलेशा भुरे
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here