Home रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सकारात्मक भूमिकेमुळे आंदोलन स्थगित – मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण

राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सकारात्मक भूमिकेमुळे आंदोलन स्थगित – मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20220828-WA0021.jpg

राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सकारात्मक भूमिकेमुळे आंदोलन स्थगित – मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण    रत्नागिरी,(सुनील धावडे)

संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे महामार्गावर उड्डाणपूल व्हावा, चिपळूण ते तळेकांटे पर्यंतचा महामार्ग गणपतीपूर्वी सुस्थितीत व्हावा, तसेच मुबई गोवा महामार्गाच्या नवीन निकृष्ठ कामाची चौकशी व्हावी या प्रमुख मागण्यासाठी मनसेच्यावतीने ठिय्या आंदोलन छेडण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सकारात्मक पत्रानंतर हे आंदोलन स्थगित करत असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी सांगितले. या आंदोलनाला रिक्षा संघटनेने सक्रिय पाठिंबा दर्शवला होता.

संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे महामार्गचे काम करत असताना कडवई दशक्रोशीतील तसेच धामापूर पंचक्रोशीतील अनेक गावामधील ग्रामस्थ व वाहन चालक यांच्या सुरक्षेचा विचार करण्यात आला नसून या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा या मागणीवर मनसेच्यावतीने यापूर्वीपासून आवाज उठवला जात आहे. या प्रमुख मागणीसह महामार्गाचे निकृष्ठ कामाची चौकशी व्हावी. तसेच खड्डे पडून नादुरुस्त झालेल्या महामार्गांची गणपतीपूर्वी दुरुस्ती व्हावी या प्रमुख मागण्यासाठी मनसेच्यावतीने जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तुरळ येथे महामार्गावर ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले.

तुरळ येथे काल(शुक्रवार) झालेल्या या आंदोलनाला रिक्षा संघटना तसेच ग्रामस्थानी सक्रिय पाठिंबा दिला. आंदोलनात सुरवातीला मगामार्गावर खड्ड्यामुळे अपघातात मृत्यू पावलेल्याना श्रद्धांजली वाहण्यात आली.यानंतर महामार्ग विभागाचे अभियता रहाटे यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक पत्र दिल्यानंतर हे आंदोलन राष्ट्रगीतानंतर स्थगित करण्यात आले.

या पत्रात महामार्गाचे खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले असून ते गणपतीपूर्वी पूर्ण केले जाईल. तसेच महामार्गाच्या नवीन कामाला गेलेले तडे पूर्ववत करण्याच्या सूचना ठेकेदारास देण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. तुरळ येथील उड्डाणपूल व सुरक्षा यासाठी स्वतंत्र अभियंता याबाबतच्या सर्व शक्यतांची पडताळणी करून साईड व्हिजीट करून अहवाल सादर करण्याचा सूचना देण्यात आल्या असून याबाबत लवकरच सकारात्मक विचार होईल असे आश्वासन देण्यात आले आहे. यानंतर हे आंदोलन स्थगीत करण्यात आले.

यावेळी मनसेचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष अनुराग कोचिरकर, उपतालुकाध्यक्ष नंदकुमार फडकले, महेश गुरव, उदय घाग ( चिपळूण), विभागध्यक्ष अजिंक्य चव्हाण, सुरेश घाग, जितेंद्र महाडिक संजय रसाळ, परेश धामनाक, तुरळ तंटामुक्ती अध्यक्ष रमेश डिके, देवरुख शहर अध्यक्ष सागर संसारे, सहायक पोलिस निरीक्षक पी.व्ही.देशमुख, उपशहर अध्यक्ष शेखर नलावडे, रिक्षा संघटना उपाध्यक्ष संदीप चिले, सल्लागार मोहन ओकटे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, मनसेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleखड्डे बुजवण्याची मागणी गोट्या खेळत करत राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन
Next articleएसटी डेपोला बाप्पा पावला, बाप्पाच्या स्वागतासाठी दीड लाख चाकरमानी कोकणकडे होणार रवाना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here