Home गडचिरोली धन्नुर कोठारी सह परिसरातील गावांचा विकास करणार आमदार डॉक्टर देवरावजी होळी

धन्नुर कोठारी सह परिसरातील गावांचा विकास करणार आमदार डॉक्टर देवरावजी होळी

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20220821-WA0058.jpg

धन्नुर कोठारी सह परिसरातील गावांचा विकास करणार

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

कोठारी धन्नुर गावच्या शिष्टमंडळाचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना विकास कामांबाबत निवेदन

 गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

धन्नुर कोठारी च्या परिसरातील काही गावे मुलचेरा तालुक्यात येत असून गडचिरोली विधानसभा क्षेत्रात येत नाही त्यामुळे त्यांचा विकास थांबलेला आहे परंतु आता राज्यात विकासाचे सरकार सत्तेत आहे . भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या नेतृत्वातील ह्या सरकारच्या माध्यमातून आपण विकासात्मक कामे करून या परिसराचा विकास नक्कीच करू असा आशावाद आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी धनुर कोठारी येथून आलेल्या शिष्टमंडळाला दिला.

कोठारी धन्नुर येथून आलेल्या शिष्टमंडळाने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना विकास कामांबाबत निवेदन दिले. यावेळी माजी सभापती नामदेवजी कुसनाके, सुभाषजी गणपती, सखारामजी शेडमाके, दीपक जी कुसनाके भाजपा तालुका अध्यक्ष दिलीपभाऊ चलाख, प्रामुख्यानं उपस्थित होते.

धनुर कोठारी हे गाव अतिदुर्ग नक्षलग्रस्त भागात आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असणारे हे गाव तालुक्याच्या दृष्टीने मुलचेरा तालुक्यामध्ये येते. मूलचेरा तालुका विधानसभेच्या दृष्टीने अहेरी विधानसभेत येतो. परंतु ही गावं गडचिरोली विधानसभा मध्ये आहेत. या परिसरात दळणवळणाच्या सोयी उपलब्ध नसल्याने तालुक्याच्या ठिकाणी पोहचणे अडचणीचे ठरते. परिणामी या गावांमध्ये अजून पर्यंत विकासाची अनेक कामे प्रलंबित आहेत. मागील तीन वर्षापूर्वी या गावात काही काम झाली होती परंतु राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार आल्याने विकासाचे काम रखडले मात्र आता ना. एकनाथ जी शिंदे व ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपा शिवसेनेची सरकार असल्याने आता विकासाला निधी कमी पडू देणार नाही . या गावाचा व परिसरातील गावांचा विकास आपण नक्कीच करू असे आश्वासन त्यांनी यावेळी आलेल्या शिष्टमंडळाला दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here