Home गडचिरोली समस्या जाणून घेण्यासाठी भाग्यश्रीताई आत्राम पोहोचल्या थेट पाड्यावर नागरिकांशी संवाद साधून पूरपरिस्थितीची...

समस्या जाणून घेण्यासाठी भाग्यश्रीताई आत्राम पोहोचल्या थेट पाड्यावर नागरिकांशी संवाद साधून पूरपरिस्थितीची घेतली माहिती

81
0

आशाताई बच्छाव

IMG-20220821-WA0047.jpg

समस्या जाणून घेण्यासाठी भाग्यश्रीताई आत्राम पोहोचल्या थेट पाड्यावर

नागरिकांशी संवाद साधून पूरपरिस्थितीची घेतली माहिती

अहेरी/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):-मागील जुलै महिन्यापासून अहेरी विधानसभेतील विविध तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातला होता.परिणामी येथील नागरिकांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागला.पुराचा पाणी शेतात आणि नागरिकांच्या घरात शिरल्याने अनेक संसार उघड्यावर आले.अश्या परिस्थितीत नागरिकांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेण्यासाठी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम थेट पाड्यावर पोहोचल्या.

नुकतेच अहेरी तालुक्यातील कमलापूर, छल्लेवाडा,राजाराम,वेंकटरावपेठा आणि देवलमरी आदी पाड्यावर जाऊन त्यांनी प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली.यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी आस्थेने संवाद साधून सुरू असलेले पंचनामे,भेटी दिलेल्या अधिकाऱ्यांची माहिती घेतली.

यावेळी विविध गावातील नागरिकांनी पावसाळयात पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.बरेच शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करूनही तोंडचा घास हिरावला गेल्याचे निदर्शनास आले.प्रशासनातर्फे पंचनामे सुरू असून पावसाळी अधिवेशनात नक्कीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार असून मदत मिळवून देण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम प्रयत्नशील असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने आमदार धर्मराव बाबा आत्राम मुंबईला आहेत आणि माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम विधानसभा पिंजून काढत स्थानिक पातळीवरील समस्या मुंबईपर्यंत पोहोचविण्याचे काम करत असल्याने येथील शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.विविध गावात भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा प्रमुख लक्ष्मण येर्रावार, अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनवास विरगोनवार, बाबुराव तोरेम, बालाजी गावडे, मखमुर शेख, सचिन सोनलवार,तसेच विविध गावातील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleधन्नुर कोठारी सह परिसरातील गावांचा विकास करणार आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Next article७५ व्या अमृत मोहत्सवात आणखी भर, आता ७५वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ‘एसटी’ महामंडळाचा असणार मोफत प्रवास
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here