Home बुलढाणा ७५ व्या अमृत मोहत्सवात आणखी भर, आता ७५वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ‘एसटी’ महामंडळाचा...

७५ व्या अमृत मोहत्सवात आणखी भर, आता ७५वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ‘एसटी’ महामंडळाचा असणार मोफत प्रवास

70
0

आशाताई बच्छाव

IMG-20220821-WA0022.jpg

७५ व्या अमृत मोहत्सवात आणखी भर,
आता ७५वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ‘एसटी’ महामंडळाचा असणार मोफत प्रवास

युवा मराठा वेब न्यूज पोर्टल प्रतिनिधी रवींद्र शिरस्कार संग्रामपूर

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रम आणि योजना राबवण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसगाडय़ांमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय राज्य सरकारनेघेतलाआहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रम आणि योजना राबवण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसगाडय़ांमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्यात ६५ हून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सध्या प्रवासभाडय़ात ५० टक्के तर शिवशाही बसेसमध्ये ४५ टक्के सवलत दिली जाते. आता ७५ हून अधिक वय असलेल्या ज्येष्ठांना एसटी प्रवासाची मोफत सुविधा उपलब्ध होणार आहे. असे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केली जाणारी वैद्यकीय विषयक उपकरणे व इतर अनुषंगिक खरेदी ही गव्हर्मेट ई-मार्केटप्लेस या पोर्टलच्या माध्यमातून करावी असे मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले आहे.
तसेच गोविंदाची मटकी फोडणाऱ्या गोविंदा पथकांसाठीसुद्धा मोठी घोषणा करण्यात आली. आहे की, गोविंदा पथकातील गोविंदांना १० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. दहीहंडी उत्सव १९ ऑगस्ट रोजी साजरा होत असून शासनाने विमा कवच द्यावे, अशी गोविंदा पथकांची मागणी होती. त्यानुसार तात्काळ हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here