Home रत्नागिरी महामार्गासाठी कोकणातील खासदार, आमदार यांचे सा. बां. मंत्री रविंद्र चव्हाण साकडे

महामार्गासाठी कोकणातील खासदार, आमदार यांचे सा. बां. मंत्री रविंद्र चव्हाण साकडे

56
0

आशाताई बच्छाव

IMG-20220822-WA0019.jpg

महामार्गासाठी कोकणातील खासदार, आमदार यांचे सा. बां. मंत्री रविंद्र चव्हाण साकडे                           रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले व निकृष्ट दर्जाचे झालेल्या कामाबाबत कोण आतील विषेशता रायगड व रत्नागिरी जिल्हय़ातील खासदार आमदार यांनी एकत्र येत नवनिर्वाचित सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची मंत्रालयात भेट घेवून या महामार्गाच्या खरडलेल्या कामाचा आढावा घेतला.

या बैठकीला खा. विनायक राऊत. खा. सुनिल तटकरे. आम. प्रविण दरेकर. आ. शेखर निकम. आ. राजन साळवी. आ. योगेश कदम. आम. वैभव नाईक. आ. रवी पाटील. आ. भरत गोगावले. आम. आदिती तटकरे. आम अनिकेत तटकरे. आ. बाळाराम पाटील. याचेसह राजन तेली. दिपक पटर्वधन आदी उपस्थित होते.

या बैठकीत या महामार्गाचे झालेले काम हे काही ठिकाणी निकृष्ट झालेले असल्याने खड्यांचे साम्राज्य झालेले असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. चालकांना गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. तसेच ठेकेदार कंपनी निधी नसल्याचे कारण देत काम रखडवत आहे. काम करताना ठेकेदार कंपनी पुरेशी काळजी न घेता काम करत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. या महामार्गाचे काम चांगल्या प्रकारे लवकरात लवकर पुर्णत्वास जावे. डोंगर खचल्याने अनेक ठिकाणी रस्ता बंद करावा लागत असल्याने त्यावरही त्वरीत कार्यवाही करावी. यासाठी मंत्री महोदयांनी जातीने लक्ष घालावे अशी मागणी या सर्वांनी केली. तसेच गणपतीसण तोंडावर असल्याने या रस्त्यांची त्वरीत डागडुजी करून गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सर्वाेतोपरी उपाययोजना करण्यात यावी. अशी मागणी करणेत आली.

या महामार्गाच्या कामाबाबतचा अवहाल तयार करून केंद्रीय मंत्री ना. नितिन गडकरी यांचे समवेत खासदारासह बैठक घेवून हे काम येत्यावर्षभरात पुर्णत्वास जाईल याकडे जातीने लक्ष घालीन. असे ना. चव्हाण यांनी स्पष्ट केले. तसेच गणपतीपुर्वी खड्डेमय रस्ता दुरूस्ती करण्याच्या सुचना संबधीतांना देवून रोजच्या कामाचा अवहाल सादर करण्यात यावा सा आदेश हि ना. चव्हाण यांनी दिला आहे.

Previous article७५ व्या अमृत मोहत्सवात आणखी भर, आता ७५वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ‘एसटी’ महामंडळाचा असणार मोफत प्रवास
Next articleकोंडये गाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सागर सुरेश देसाई सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here