Home रत्नागिरी कोंडये गाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सागर सुरेश देसाई सलग दुसऱ्यांदा बिनविरोध

कोंडये गाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सागर सुरेश देसाई सलग दुसऱ्यांदा बिनविरोध

66
0

आशाताई बच्छाव

IMG-20220822-WA0008.jpg

कोंडये गाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सागर सुरेश देसाई सलग दुसऱ्यांदा बिनविरोध                            रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

संगमेश्वर तालुक्यातील कोंडये गावच्या पंधरा ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदी ग्रामपंचायतचे माजी सदस्य सामाजिक कार्यात अग्रेसर होऊन धडपडणारे तसेच उच्च शिक्षित असलेले सागर सुरेश देसाई यांची तंटामुक्त अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

सरपंच महेश प्रभाकर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ग्रामसभेत सामाजिक कार्यात गावातच नव्हे, तर संपूर्ण खाडीभागात अग्रस्थानी राहणारे तसेच या पूर्वी त्यांच्याकडे गावाने सोपवलेली तंटामुक्त समिती अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी समिती सदस्य व ग्रामस्थांना बरोबर व विश्वासात घेत गावातील छोटे-मोठे तंटे पोलीस ठाण्या पर्यंत न जाऊ देता गाव पातळीवर मिटवण्याचा प्रयत्नच नव्हे तर यशस्वीही केला. तसेच गावात तंटे होऊ नये या करीता जनजगृतीही तेवढयाच जोमाने केला.

या कार्याची दखल घेत ग्रामस्थांच्या उपस्थित झालेल्या ग्रामसभेत पुन्हा तंटामुक्त समिती अध्यक्षपदाची जबाबदारी सागर देसाई यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या सभेत गावच्या पहिल्या महिला सरपंच होण्याचा ज्यांनी मान मिळवला होता त्या माजी सरपंच सौ.पूनम महेश देसाई, ग्रामसेवक विजापुरे, पोलीस पाटील विजय शिंदे, माजी सरपंच सुरेश दसम, सुनील देसाई, रामचंद्र पडये, माजी उपसरपंच दीपक शिंदे, दीपक उर्फ बंड्या शिंदे आदी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

आपल्या कार्यची दखल घेत गावाने माझ्यावर पुन्हा जी जबाबदारी सोपवली आहे, ती यापुढेही समिती सदस्य आणि ग्रामस्थांना बरोबर व विश्वासात घेवूनच योग्य प्रकारे पार पडणार असल्याचे प्रतिपादन सागर देसाई यांनी केले. सागर देसाई यांच्या कार्याचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Previous articleमहामार्गासाठी कोकणातील खासदार, आमदार यांचे सा. बां. मंत्री रविंद्र चव्हाण साकडे
Next articleश्रेया कुलकर्णी कै. मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची ठरली मानकरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here