Home रत्नागिरी श्रेया कुलकर्णी कै. मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची ठरली मानकरी

श्रेया कुलकर्णी कै. मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची ठरली मानकरी

35
0

आशाताई बच्छाव

IMG-20220822-WA0007.jpg

श्रेया कुलकर्णी कै. मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची ठरली मानकरी

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- कै.मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेमध्ये श्रेया उमेश कुलकर्णी हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर जिल्हास्तरीय कनिष्ठ गटामध्ये सृष्टी शिंदे हिने प्रथम क्रमांक संपादन केला असून जिल्हास्तरीय माध्यमिक गटामध्ये अंशिका तिवारी(इंग्रजी) आणि संस्कृती कटके(मराठी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रात ख्यातनाम असलेल्या या स्पर्धेचा वरिष्ठ गटाच्या सांघिक चषकावर आठल्ये सप्रे महाविद्यालयाने आणि जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन गटाचा चषकावर अभ्यंकर कुलकर्णी महाविद्यालयाने नाव कोरले.

कै. मृणाल हेगशेट्ये आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा दरवर्षी महाविद्यालयात आयोजित केल्या जातात. गेली 35 वर्ष ही स्पर्धा सुरू आहे. राज्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा या स्पर्धेत मोठा सहभाग असतो. यावर्षी ही स्पर्धा शनिवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसादात माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन आणि वरिष्ठ महाविद्यालयीन अशा गटामध्ये स्पर्धा पार पडली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जे. एस.डब्ल्यू जयगडचे सीएसआर इन्चार्ज श्री धदीच , फिशरीज कॉलेजचे डीन डॉ. शिंगारे, ज्येष्ठ विधीतज्ञ विलास पाटणे, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये , एस. पी. हेगशेट्ये विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अशा जगदाळे, नवनिर्माण हायच्या संचालिका सीमा हेगशेट्ये, नवनिर्माण हायच्या प्राचार्या नजमा मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना गौरवण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी श्री.दधीच यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आज कृतिशील बनणे गरजेचे आहे. विचाराद्वारे केलेल्या कृतीचे चांगले परिणाम दिसून येतात. विद्यार्थ्यांनी आवडत्या विषयात किंवा क्षेत्रात कामगिरी करण्यासाठी फोकस करणे गरजेचे आहे. मृणाल हेगशेट्ये वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून कृतिशील वक्ते निर्माण होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. वाचनातून आचार विचार मिळतात त्यातूनच वक्ता घडतो असे फिशरीज कॉलेजचे डीन डॉ शिंगारे म्हणाले.

यावेळी ऍड. विलास पाटणे, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, परीक्षक शंकर जाधव, मुख्याध्यापिका सारिका गुजराती यांनी मनोगत व्यक्त केली. परीक्षक म्हणून राज्यस्तरीय वरिष्ठ गटासाठी प्रा. शिवराज गोपाळे, प्रा. प्रकाश नाईक यांनी काम पाहिले तर जिल्हास्तरीय कनिष्ठ गटासाठी प्रा.शंकर जाधव, माजी सरपंच आणि कांचन आंब्रे आणि माध्यमिक गटासाठी मुख्याध्यापिका सारिका गुजराती व शिवाजी सावंत यांनी काम पाहिले

स्पर्धेचा निकाल याप्रमाणे
राज्यस्तरीय वरिष्ठ महाविद्यालयीन गट

प्रथम – श्रेया उमेश कुलकर्णी (किर लॉ कॉलेज, रत्नागिरी)
द्वितीय -सिद्धी अरुण नार्वेकर (मुंबई उपकेंद्र रत्नागिरी)
तृतीय – स्वरूप प्रकाश दोरखडे (आठले सप्रे कॉलेज,देवरुख)
उत्तेजनार्थ प्रथम- तनुजा महेंद्र शिवतरकर (आठले सप्रे कॉलेज देवरुख)
उत्तेजनार्थ द्वितीय- सानिका संतोष पवार(फिनॉलेक्स कॉलेज रत्नागिरी )

जिल्हास्तरीय कनिष्ठ गट
प्रथम -सृष्टी शिंदे( डीबीजे कॉलेज, चिपळूण)
द्वितीय -जान्हवी जोशी (अभ्यंकर कुलकर्णी कॉलेज रत्नागिरी)
तृतीय -अथर्व दळवी (रोटरी ज्युनियर कॉलेज खेड)
उत्तेजनार्थ प्रथम- साक्षी जयवंत पवार( न्यू इंग्लिश स्कूल लांजा)
उत्तेजनार्थ द्वितीय- नेहा शेणवी (नवनिर्माण कॉलेज रत्नागिरी)

जिल्हास्तरीय माध्यमिक गट मराठी माध्यम

प्रथम -संस्कृती नामदेव कटके (डीजे सामंत स्कुल पाली)
द्वितीय -चैत्राली रुपेश सावंत (नवनिर्माण हाय )
तृतीय – मानसी विद्याधर पालांडे (दलवाई हायस्कूल मिरजोळी चिपळूण)
उत्तेजनार्थ प्रथम- शिवम शरद बेंद्रे (नवनिर्माण हाय)
उत्तेजनार्थ द्वितीय -संजीवनी बळवंत मोहिते( एनजी कुलकर्णी विद्यालय सागवे राजापूर )

माध्यमिक गट इंग्रजी माध्यम
प्रथम -अंशिका तिवारी( जिंदल विद्यालय जयगड)
द्वितीय -रोज मारिया सोजेन कुरीसिंगल( एसव्हीआयसीआय सावर्डे, चिपळूण)
तृतीय -श्रावणी गुरव जे (नवनिर्माण हाय)
उत्तेजनार्थ प्रथम- मीरा. जोशी (नवनिर्माण हाय)
उत्तेजनार्थ द्वितीय -अथर्व अण्णासाहेब बनसोडे (माने इंटरनॅशनल स्कूल रत्नागिरी)

Previous articleकोंडये गाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सागर सुरेश देसाई सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Next articleधर्मशास्त्राच्या उपक्रमांसाठी संस्थांचा एकत्रित आराखडा हवा- प्रो. विजयकुमार मेनन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here