Home रत्नागिरी फरार कुख्यात गुंड साहील काळसेकरला उद्यमनगर येथून ठोकल्या बेडया

फरार कुख्यात गुंड साहील काळसेकरला उद्यमनगर येथून ठोकल्या बेडया

30
0

आशाताई बच्छाव

IMG-20220807-WA0021.jpg

फरार कुख्यात गुंड साहील काळसेकरला उद्यमनगर येथून ठोकल्या बेडया                                         रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

शिक्षा भोगत असताना अमरावती कारागृहातून पलायन करणाऱ्या कुविख्यात गुन्हेगार साहील अजमत काळसेकर (रा.मूळ, रा. नायशी, ता . चिपळूण) याला रत्नागिरी शहर पोलीसांनी शनिवारी सायकांळी शहरातील उद्यमनगर येथून ताब्यात घेतले आहे. पोलीसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या साहीलची पोलीस पथकाशी झटापट झाली. त्यानंतर पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा त्याच्यावर शासकिय कामात अडथळा केल्याचा गुन्हा शहर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला आहे.
अमरावती कारागृहात शिक्षा भोगत असताना दि. २८ जून रोजी रात्रीच्या सुमारास तीन कैद्यांनी कारागृहातून पलायन केले होते. त्यामध्ये चिपळूण नायशी मधील अजमत काळसेकर याचा समावेश होता. साहील मुळचा रत्नागिरीचा असल्याने त्याला शोधण्याची जबाबदारी रत्नागिरी पोलीसांवर देण्यात आली होती.

शनिवारी सायकांळी साहील शहरातील उद्यमनगर परिसरात आला असल्याची माहिती शहर पोलीसांना मिळाली होती. त्यानंतर पोहवा. प्रविण बर्गे, पोना गणेश सावंत, पोना आशिष भालेकर, पोना पंकज पडेलकर यांना सायंकाळी उद्यमनगर एमआयडीसी येथील शेट्येनगरकडे जाणारे रस्त्यावर एका टपरीवर आरोपी साहील काळसेकर उभा असलेला दिसुन आला. त्याचा दिशेने जात असताना, तो पोलीसांना पाहून पळून लागला. त्यावेळी त्याने टपरीच्यामागे असणाऱ्या गडग्यावरून उडी मारली. त्यानंतर पोलीसांनी त्याचा पाठलाग सुरु केला. पोलीस साहीलचा पाठलाग करताना साहील काळसेकर हा पुढील एका गडग्यावरून उडी मारत असताना गडग्याला धडकून पडला. यावेळी त्याची पोलीसांची झटापट झाली. अखेर पोलीस पथकाने त्याला पळत जाऊन पकडले. तेव्हा साहीलने हाताला हिसका देऊन ढकलुन आरडोओरडा शिवीगाळ करुन , मोठमोठयाने वाद घालुन लाथा झाडुन, झटापट करुन स्वत:ला सोडवून घेतले व पुन्हा पळू लागला. त्यानंतर पोलीस पथकाने पुन्हा त्याचा पाठलाग सुरु केला. त्यानंतर सदर पोलीस पथकामध्ये असलेले प्रविण बर्गे , पोना आशिष भालेकर, पोना पंकज पडेलकर यांनी त्याला झडप घालून पकडले.

रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात पोना गणेश सावंत यांनी दिलेल्या तक्रारी नुसार भा.द.वि.क. ३५३,३३२,५० ४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. साहील कडून ताब्यात घेण्यात आलेली पल्सर मोटार सायकल ही चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झालेले असुन त्याबाबत राबोडी पोलीस ठाणे जि. ठाणे येथे भा.द.वि.क ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

आरोपी साहील अजमत काळसेकर हा जिल्ह्यातील रेका@र्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर रत्नागिरी जिल्ह्यात खुन, खुनाचा प्रयत्न घरफोडी, चोरी, सरकारी नोकरारा हरकत, गर्दी मारामारी आत्महत्तेचा प्रयत्न, तसेच रखवालीतुन पळून जाणे असे एकुण ३६ गुन्हे दाखल असुन रत्नागिरी ग्रामिण पोलीस स्थानकातील भा.द.वि.क ३०७ , ३५३ प्रमाणे दाखल गुन्ह्यात न्यायालयाकडुन जन्म ठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली असुन तो शिक्षा भोगत असताना अमरावती कारागृहातून पळाला होता.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. मोहीत कुमार गर्ग यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, उप विभागीय पोलीस अधिकारा श्री. सदाशिव वाघमारे, पोलीस निरिक्षक श्री विनित चौधरी यांचे मार्गदर्शना खाली, सपोनि मनोज भोसले, पोहवा प्रविण बर्गे, पोना गणेश सावंत, पोना आशिष मालेकर, पोनापंकज पडेलकर यांनी केली. या गुन्हयाचा तपास सपोनि मनोज भोसले करत आहेत.

Previous articleभरधाव कारने दुचाकीस्वारास उडवले; दोन जण गंभीर जखमी
Next articleपुरातत्व विभाग आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक जन्मस्थान स्मारकाची स्वच्छता
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here