Home रत्नागिरी पुरातत्व विभाग आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक जन्मस्थान...

पुरातत्व विभाग आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक जन्मस्थान स्मारकाची स्वच्छता

36
0

आशाताई बच्छाव

IMG-20220807-WA0020.jpg

पुरातत्व विभाग आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक जन्मस्थान स्मारकाची स्वच्छता

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) – स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच ‘, अशी सिंहगर्जना करणारे महान स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या रत्नागिरी शहरातील टिळक आळी येथील जन्मस्थान स्मारकाची पुरातत्व विभाग आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ३० जुलै २०२२ या दिवशी स्वच्छता करण्यात आली. जन्मस्थान स्मारकाचा परिसर आणि लोकमान्य टिळक यांचा पूर्णाकृती पुतळा स्वच्छ करण्यात आला. यामध्ये पुरातत्व विभागाचे श्री. रवींद्र सावंत, पेठ किल्ला येथील सर्वश्री तन्मय जाधव , आदित्य कौजलगीकर, साईराज बिर्जे, कु. कार्तिक टापरे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री महेश लाड, वसंत दळवी आणि अन्य कार्यकर्ते आदी सहभागी झाले होते.

लोकमान्‍य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्‍म २३ जुलै १८५६ या दिवशी रत्नागिरीतील टिळक आळीतील सदोबा गोरे यांच्या घरात झाला. आज हे जन्मस्थान स्मारक भारतीयांच्या आस्थेचे केंद्र बनले आहे. हे जनमस्थान स्मारक महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येते.

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या कु. नारायणी शहाणे यांनी स्मारक स्वच्छता करण्यामागील उद्देश सांगून लोकमान्य टिळकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. क्रांतीकारक आणि राष्ट्रप्रेमी यांनी राष्ट्रासाठी केलेल्या त्यागाचे महत्त्व तरुण पिढीला समजावे, यासाठी १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हिंदु जनजागृती समितीतर्फे ‘क्रांतीकारकांची शौर्यगाथा असलेले ‘ क्रांतीगाथा ‘ हे प्रदर्शन जिल्ह्यात ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

उपस्थितांनी भविष्यातही असे उपक्रम करायला आम्ही सदैव सहकार्य करु, असे सांगितले. सर्वांसाठी श्री. गिरीश जोशी यांनी चहाची व्यवस्था केली.

Previous articleफरार कुख्यात गुंड साहील काळसेकरला उद्यमनगर येथून ठोकल्या बेडया
Next articleकवितेमध्ये आशय आणि अभिव्यक्तीला महत्त्व : जयश्री बर्वे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here