Home जळगाव महिलेला वेगवेगळ्या हॉटेलवर घेऊन जात चौघांनी केला अत्याचार ! पाचोरा पोलिसात गुन्हा...

महिलेला वेगवेगळ्या हॉटेलवर घेऊन जात चौघांनी केला अत्याचार ! पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल.

80
0

आशाताई बच्छाव

IMG-20230916-WA0040.jpg

महिलेला वेगवेगळ्या हॉटेलवर घेऊन जात चौघांनी केला अत्याचार ! पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल.

खान्देश विभागीय संपादक, योगेश पाटील.

जळगाव जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीसह महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना दिसत आहे. नुकतेच भडगाव तालुक्यातील एका ३६ वर्षीय महिलेला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यावर जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या हॉटेलवर नेत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भडगाव शहरातील एका परिसरातील ३६ वर्षीय महिला शिवणकाम करून आपला उदरनिवार्ह करीत आहे. सन २००८ पासून ते १५ मे २०२३ या कालावधीत पर्यंत रिजवान जैनउद्दीन शेख वय ४२, धंदा• ड्रायव्हर, रा. वाल्मिकनगर, मंगलकार्यालय जवळ, चाळीसगाव, ता.चाळीसगाव. पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवुन वारंवार तिला विविध ठिकाणी यात सुधाशांती लाँज पाचोरा तसेच विलास लॉज जळगांव तसेच चाळीसगांव येथील लॉजचे नांव माहीत नाही आधी ठिकाणी शारीरीक संबंध निर्माण केले आहे.

तसेच इमरान जैनउद्दीन शेख रा. वाल्मिकनगर, चाळीसगाव याने दि. १५ मे २०२३ रोजी फिर्यादी शुध्दीत नसतांना फिर्यादी सोबत पाचोरा येथील सुधा शांती लॉज येथे फिर्यादीचे संमतीशीवाय शारीरीक संबंध केले तसेच रिजवानचा भाऊ इमरान जैनउद्दीन शेख, मोहिद्दीन जैनउद्दीन शेख व रिजवानची बायको इशरतबी असे फिर्यादीस वारंवार अश्लील शिवीगाळ करुन पिडीतला जिवे मारण्याची धमकी देत होते. त्यामुळे पीडित महिलेने घाबरून आरोपींविरुद्ध पोलिसात तक्रार दिली नव्हती. मात्र महिलेने अखेर पाचोरा पोलीस स्टेशनला धाव घेऊन रिजवान जैनउद्दीन शेख, इमरान जैनउद्दीन शेख, मोहिद्दीन जैनउद्दीन शेख, रिजवानची बायको सर्व रा. यांच्याविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला पीडित महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे करीत आहे.

Previous articleहतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले; तापी वाहतेय दुथडी, जळगाव जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा
Next articleपुष्पगुच्छ ऐवजी ‘पुस्तके भेट देण्याबाबत मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे परिपत्रक जारी…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here