Home जळगाव पुष्पगुच्छ ऐवजी ‘पुस्तके भेट देण्याबाबत मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे परिपत्रक जारी…

पुष्पगुच्छ ऐवजी ‘पुस्तके भेट देण्याबाबत मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे परिपत्रक जारी…

31
0

आशाताई बच्छाव

IMG-20230916-WA0037.jpg

पुष्पगुच्छ ऐवजी ‘पुस्तके भेट देण्याबाबत मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे परिपत्रक जारी…

खान्देश विभागीय संपादक, योगेश पाटील.

जळगाव जिल्ह्यात शासनाच्या विविध भूमीपुजन, कल्याणकारी योजनांचे लोकार्पण, उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात येते. तसेच विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात येते. या शासकीय कार्यक्रमांत / बैठकांमध्ये निमंत्रित मान्यवर, अधिकारी यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात येत असते, पुष्पगुच्छ स्विकारलेनंतर त्या पुष्पगुच्छाचा पुन्हा काहीएक उपयोग होत नाही.

समारंभ, भेटवस्तु/पुष्पगुच्छाऐवजी पुस्तके शासकीय कार्यालयांनी देण्याची कार्यवाही करणेत यावी. तसेच शासकीय अधिकारी ज्या कार्यक्रमांत उपस्थित राहतील, त्या कार्यक्रमाचे आयोजकांना पुस्तके भेट स्वरुपात देण्याचे आवाहन कार्यक्रम स्वीकारते प्रसंगी शासकीय अधिकारी यांचेद्वारे करणेत यावे. भेट देण्याची पुस्तके
ही साधारणतः पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या वापरात येतील, स्पर्धा परिक्षांसाठी उपयोगी येतील अशी असावीत. बैठकांमध्ये शासकीय अधिकारी यांना समारंभात / बैठकांत प्राप्त होणारी पुस्तके ही जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांचेकडेस दरमहा जमा करावीत. जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी अधिकारी यांचेकडून प्राप्त झालेली पुस्तकांची वर्गवारी करून जिल्हा ग्रंथालयात ती वाचनासाठी उपलब्ध करुन द्यावी. जिल्हा ग्रंथालयात पुस्तकांची निकड नसल्यास
जिल्ह्यातील तालुकास्तरावरील / ग्रामीण भागात कार्यरत शासकीय/निमशासकीय ग्रंथालये, वाचनालये यांची वाचकसंख्येच्या नुसार प्राधान्य क्रम निश्चीत करुन त्यांचेकडेस पुस्तके हस्तांतरित करणेत यावीत.
या उपक्रमामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पुस्तकांची उपलब्धता होईल सोबतच स्वागताप्रसंगी दिली जाणारी भेटवस्तुचा सदुपयोग होईल. उपक्रमात सुचविलेली पुस्तकांची यादी ही मार्गदर्शन स्वरुपात असुन बंधनकारक नाही. वाचनासाठी उपयुक्त पुस्तके देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. उपक्रमासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. सुहास रोकडे मो.नं. ९७६६६३६३२६ यांची नियुक्ती करणेत येत असुन त्यांनी विभागप्रमुखांच्या संपर्कात राहुन उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here