Home Breaking News “अनाम प्रेम” ‘च्या वतीने अग्निशमन दलातील बांधवाचा गौरव

“अनाम प्रेम” ‘च्या वतीने अग्निशमन दलातील बांधवाचा गौरव

89
0

 

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहारमधील वडगांव नगरपरिषेदेच्या अग्निशमन दलातील कर्मचारी बांधवांचा शिख धर्मियांचे प्रथम गुरू गुरु नानक यांच्या जयंती निमित्त आज “अनाम प्रेम” या सामाजिक परिवारा च्या वतीने गुरू नानक जंयतीचे औचित्य साधून वडगांव शहराला रांत्रदिवस नागरिकांच्या सेवेस तत्पर असणारे अग्निशमन दलातील बांधवाना भेट कार्ड , गुलाबपुष्प व मिठाई भेट देऊन गौरव करण्यात आला .
गेली ११ वर्ष सतत हा उपक्रम “अनाम प्रेम ” या सामाजिक परिवाराच्या वतीने राबवण्यात आला आहे. या सामाजिक परिवाराचे खास वैशिष्ट्य म्हणजे या “अनाम ” परिवारात कोणीही पदाधिकारी अध्यक्ष ,उपाध्यक्ष नसुन काही सामाजिक कार्यकर्ते या परिवाराच्या माध्यमातून आजपर्यंत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
या कार्यक्रमास वडगांवचे जेष्ठ पत्रकार श्री.रेमेश बोभाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत , व “अनाम प्रेम” चे प्रमुख मा.श्री. शिवाजी चौगुले यांच्या सौजन्याने , श्री .राजू पोवार , श्री.सागर पोवार , श्री.आदिक धनवडे , श्री .किरण आयरेकर , श्री. प्रशांत आवळे , श्री .सुरेश कांबळे ,श्री. केतन धनवडे , श्री.अंकुश कदम ,श्री. मयूर धनवडे ,श्री. सुशांत आवळे , श्री. गणेश नायकवडी ,श्री. ऋषिकेश धनवडे इत्यादी अग्निशमन कर्मचारी बांधवाचा गौरव करण्यात आला.

कोल्हापूर (युवा मराठा न्यूज नेटवर्क .)

Previous articleस्वर्गीय.डाँ.बाबा आमटे यांची नात डाँ.शितल आमटेंची आत्महत्या
Next article*सध्या पीक विम्याच्या तक्रारी करून शेतकरी बांधवांची लूट करू नये व मायबापाच्या भावनांशी खेळू नये शेतकरी पुत्रांचे आवाहन..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here