• Home
  • *सध्या पीक विम्याच्या तक्रारी करून शेतकरी बांधवांची लूट करू नये व मायबापाच्या भावनांशी खेळू नये शेतकरी पुत्रांचे आवाहन..

*सध्या पीक विम्याच्या तक्रारी करून शेतकरी बांधवांची लूट करू नये व मायबापाच्या भावनांशी खेळू नये शेतकरी पुत्रांचे आवाहन..

*सध्या पीक विम्याच्या तक्रारी करून शेतकरी बांधवांची लूट करू नये व मायबापाच्या भावनांशी खेळू नये शेतकरी पुत्रांचे आवाहन..
मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड ,* सर्व csc बांधवांना विनंती…
सध्या शेतकरी बांधवांच्या mail किंव्हा crop insurance App द्वारे तक्रार नोंद करण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे त्या तक्रारी कायदेशीर नाहीत कारण
सध्या कोणत्याही प्रकारची स्थानिक नैसर्गिकआप्पत्ती झालेली नाही त्यामुळे कोणीही सध्या तक्रारी करू नये.
1) पीक विमा ही योजना मुख्यमंडळ निहाय असल्या कारणाने दर वर्षी फेबुवारी/मार्च महिन्यात मंडळनिहाय पीक विमा लागू होण्याची प्रक्रिया पूर्ण होते या साठी कुठेही तक्रार करण्याची गरज नसते.
2) पीक विमा चा दुसरा भाग म्हणजे वैयक्तिक रित्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती…. पुराणे वाहून जाणे,पुराचे पाणी जास्त दिवस शेतातथांबणे, भूसखलन होणे, वीज पडणे, नैसर्गिक आग लागणे इत्यादी बाबतीत शेतकरी बांधवांनी शासन निर्णयानुसार 72 तासात टोल फ्रीनंबर, crop insurance App,तालुका कृषी कार्यालयात, mail इत्यादी पैकी एका ठिकाणी तक्रार नोँदवावी.
सध्या कोणतीही नुकसान आप्पत्ती नाही त्यामुळे सध्या तक्रार नोंदवू नये.
ज्या तक्रारी वेळेत असतील त्यांचे रीतसर पंचनामे होतील, जेव्हडे नुकसान असेल तेव्हडी भरपाई एक महिन्यात देय असते…
तीच रक्कम दि. 12/11/2020 रोजी कंपनी कडून वितरित झाली आहे त्यामुळे शेतकरी बांधवात संभ्रम निर्माण झाला की तक्रार नोंद केल्यावरच विमा मिळतो त्या मुळे कांही शेतकरी बांधव आज ही तक्रार नोंद करण्यासाठी आपल्याकडे येत आहेत.
मंडळ निहाय पिक कापणी प्रयोगानुसार पीक विमा लागू होणे अजून बाकी आहे असे आवाहन शेतकरी पुत्रांनी सर्व नांदेड जिल्ह्यातील शेतकरी मायबापाना केले.
*पेटविले रणांगणे देह झिजविला मातीसाठी…*
*मरणाच्याही दारात लढलो आम्ही शेतकरी मायबापासाठी..

anews Banner

Leave A Comment