Home पुणे टेमघर गळती रोखण्यासाठी २५ कोटी; दीर्घ कामाचे नियोजन 🛑

टेमघर गळती रोखण्यासाठी २५ कोटी; दीर्घ कामाचे नियोजन 🛑

98
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 टेमघर गळती रोखण्यासाठी २५ कोटी; दीर्घ कामाचे नियोजन 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

पुणे :⭕शहराला पाणीपुरवठा करणार्‍या प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या टेमघर धरण दुरूस्तीच्या कामासाठी अर्थसंकल्पात 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

या निधीतून कमी कालावधीतील गळती प्रतिबंधक कामे पूर्ण करण्यात येणार आहेत, तर दीर्घ कालावधीच्या कामांचे नियोजन करण्यात येणार आहे.

पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी आणि एक हजार हेक्टर क्षेत्रफळ सिंचनाखाली आणण्यासाठी मुळशी तालुक्यातील लव्हार्डे येथे टेमघर धरण बांधण्यात आले आहे. या धरणाचे काम 2000 मध्ये सुरू होऊन 2010-11 पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा याठिकाणी करण्यात येत होता. सन 2017 मध्ये धरणातून पाणीगळती होत असल्याचे निदर्शनास आले. तेव्हापासून या धरणाच्या मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. या धरणाची क्षमता 3.71 अब्ज घनफूट (टीएमसी) आहे. धरण बांधणीसाठी 252 कोटी रुपये खर्च आला होता. गळती रोखण्यासाठी केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन संस्थेच्या (सीडब्ल्यू अ‍ॅण्ड पीआरएस) तज्ज्ञ समितीकडून कामाची पाहणी करण्यात येत आहे. धरणाची गळती 90 टक्के रोखल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून करण्यात येत असला, तरी दीर्घकालीन कामे करणे आवश्यक आहे.

दरम्यान, धरणाच्या वरील बाजूची कामे झाली असून खालच्या बाजूची कामे बाकी आहेत. त्याकरिता 25 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता होती. त्यानुसार अर्थसंकल्पात दुरूस्तीच्या कामांसाठी 25 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून कमी कालावधीतील गळती प्रतिबंधक कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच सीडब्ल्यू अ‍ॅण्ड पीआरएस या संस्थेला काही निधी देऊन दीर्घ कालावधीची कामे, धरण मजबूतीकरण यांबाबत विविध चाचण्या व छाननी करणे ही कामे करण्यात येणार आहेत, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

धरणाच्या खालच्या बाजूचे काम बाकी.या धरणाच्या दुरुस्तीचे काम 2017 पासून सुरू आहे. कोरोना काळात दुरुस्तीची कामे थांबवण्यात आली होती. उर्वरित दीर्घ कालावधीची कामे करण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता आहे.

त्यासाठी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठका झाल्या आहेत. कमी कालावधीच्या धरण दुरुस्तीची कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

त्यासाठी हे धरण रिकामे करण्यात येत असून या धरणात सध्या 0.50 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे…⭕

Previous articleपवार ऍक्शन मोडवर : मुख्यमंत्र्यांना न भेटता थेट नांगरे पाटलांना बोलावले, अर्धा तास चर्चा
Next articleवनाझ ते शिवाजीनगर मेट्रो ड्रोन मधून पहा कसा दिसतोय मार्ग…! लवकरच होणार ट्रायल रन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here