Home नांदेड खळबळजनक” नांदेड जिल्ह्यातील घटना – कोरोनामुळे पतीचे मृत्यू झाल्याचे कळताच पत्नीने केली...

खळबळजनक” नांदेड जिल्ह्यातील घटना – कोरोनामुळे पतीचे मृत्यू झाल्याचे कळताच पत्नीने केली चिमुकलीसह आत्महत्या

116
0

राजेंद्र पाटील राऊत

खळबळजनक” नांदेड जिल्ह्यातील घटना – कोरोनामुळे पतीचे मृत्यू झाल्याचे कळताच पत्नीने केली चिमुकलीसह आत्महत्या

राजेश एन भांगे/ ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

लोहा शहरातील बालाजी मंदिरच्या पाठीमागे तेलंगणातून आलेले एक कुटुंब रोज मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करीत होते.
तर कोरोना महामारीने या कुटुंबात शिरकाव केला.
पती हनुमंत शंकर गदम (वय ४५) हे पॉझिटीव्ह आल्यानंतर लोहा येथील कोविड सेंटर येथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ही बातमी पत्निला कळताच तीन वर्षाच्या मुलीसह महिलेने सुनेगाव येथील तलावात उडी मारुन आत्महत्या केली.

शहरातील बालाजी मंदिरच्या पाठीमागे ही हृदयद्रावक घटना घडली आहे.
ही घटना बुधवारी (ता .१४) पहाटे घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पद्मा हनुमंत गदम (वय ३५) लल्ली (वय तीन) अशी मृत मायलेकराचे नावे आहेत.
या घटनेमुळे परिसर हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्माने नवऱ्याच्या निधनानंतर तीन मुलांना घेऊन संसाराचा गाडा चालणार कसा या चिंतेने आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

फिर्यादी चिन्नना दुर्गना गदम (वय ३९) रा. संतोषनगर निजामबाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन लोहा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तर पुढिल तपासपोलिस निरीक्षक भागवत जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. कऱ्हे हे करीत आहेत असे सुत्रांकडुन कळाले.

Previous articleमोठी बातमी: आता कडक लॉकडाऊनच्या हालचाली..!दोन दिवसांत उचलणार कठोर पावले
Next articleपांढरुणला ताडी अड्ड्यावर पोलिसांचा छापा अडीचशे लिटर ताडी जप्त,गुन्हा दाखल..!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here