Home माझं गाव माझं गा-हाणं पांढरुणला ताडी अड्ड्यावर पोलिसांचा छापा अडीचशे लिटर ताडी जप्त,गुन्हा दाखल..!

पांढरुणला ताडी अड्ड्यावर पोलिसांचा छापा अडीचशे लिटर ताडी जप्त,गुन्हा दाखल..!

136
0

राजेंद्र पाटील राऊत

पांढरुणला ताडी अड्ड्यावर पोलिसांचा छापा
अडीचशे लिटर ताडी जप्त,गुन्हा दाखल..!
(निंबा जाधव विभागीय संपादक युवा मराठा न्युज)
तळवाडे-मालेगांव तालुक्यातील पांढरुण गावाच्या शिंद बन भागात बेकायदेशीररित्या ताडीचा अड्डा चालविणा-यांवर काल वडनेर खाकुर्डी पोलिसांनी छापा टाकून अडीचशे लिटर ताडी जप्त करण्याबरोबरच संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की,पांढरुण गावाच्या शिंद बन शेजारी बेकादेशीरपणे ताडीचा अड्डा चालवून,कोरोना नियमाचे कुठलेही पालन न करता नागरिकांची वर्दळ जमविणा-या संबंधित गुतेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वडनेर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार राऊत व पोलिस कर्मचाऱ्यांनी छापा टाकून हि कारवाई केली.
दरम्यान कोरोना महामारी संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या सगळेच अवैध धंदे बंद होत असतानाच,मात्र पांढरुण परिसरातला हा ताडी विक्रेता बेकायदेशीरपणे राजरोस कोरोना नियमावलीची पायमल्ली करुन ताडी विक्री करीत होता.मात्र याकडे पांढरुण ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यानेच या ताडी विक्रेत्याचे फावले होते आणि त्याच्या या धंद्याला ग्रामपंचायत प्रशासनाने कुठलीही आडकाठी न केल्यामुळेच या ताडी विक्रेत्याकडून कोरोना महामारीचा दाट फैलाव होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here