Home जळगाव हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले; तापी वाहतेय दुथडी, जळगाव जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा

हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले; तापी वाहतेय दुथडी, जळगाव जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20230916-WA0041.jpg

हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले; तापी वाहतेय दुथडी, जळगाव जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा

खान्देश विभागीय संपादक, योगेश पाटील.

जळगाव : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे शनिवारी धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील रावेर-मुक्ताईनगर तालुक्यासह नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

धरणाखाली भुसावळ, यावल, चोपडा, अंमळनेर, जळगाव, जामनेर, एरंडोल, धरणगाव, या सर्व तालुक्यातील नदी काठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. हतनुर धरणातून चार लाख क्युसेस पाणी प्रवाह सोडण्यात येणार असे नियोजन करण्यात आलेले आहे.

तसेच सर्व तहसीलदार व पोलीस विभागास नदी काठच्या गावी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पोलीस विभागास विभागाकडे असलेल्या बोटी बोटी तसेच पट्टीचे पोहणारे नावाडी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक आपला मित्र पथक यांना नदीच्या गावी तत्पर आणि बाबत कळविले आहे.

सतर्कतेचा इशारा.
पाण्याचा विसर्ग वाढल्याने तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणाचे सर्व दरवाजे पूर्ण उघडल्याने नागरिकांनी नदीपात्रा लगत जाऊ नये, गुराढोरांनाही त्यापासून दूर ठेवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Previous articleजिल्ह्यात भीषण अपघात : प्रवासी बस पलटली; दोन ठार !
Next articleमहिलेला वेगवेगळ्या हॉटेलवर घेऊन जात चौघांनी केला अत्याचार ! पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here