Home जळगाव जिल्ह्यात भीषण अपघात : प्रवासी बस पलटली; दोन ठार !

जिल्ह्यात भीषण अपघात : प्रवासी बस पलटली; दोन ठार !

86
0

आशाताई बच्छाव

IMG-20230916-WA0042.jpg

जिल्ह्यात भीषण अपघात : प्रवासी बस पलटली; दोन ठार !

खान्देश विभागीय संपादक, योगेश पाटील.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात सकाळच्या सुमारास एक लक्झरी बस उलटून झालेल्या भीषण अपघातात १२ प्रवासी जखमी तर दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल ते जळगाव दरम्यान पिंपळकोठा गावाजवळ ३० प्रवासी असलेल्या स्लीपर लक्झरीचा अपघात झाल्याने २ प्रवाशांचा मृत्यू झाला असून इतर प्रवासी जखमी झाल्याची घटना सकाळी साडेनऊच्या समारास घडले आहे. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले आहे.

जळगाव ते एरंडोल दरम्यान असलेल्या पिंपळकोठा गावाजवळ चौधरी कंपनीच्या लक्झरी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बस ही नाल्याच्या खाली जाऊन कोसळल्याची घटना शनिवारी १६ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता घडली आहे.

यात बसमधील बारा प्रवासी जखमी झाली असून यातील दोघे जण ठार झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने एरंडोल ग्रामीण रुग्णालय आणि जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यास मदत केली.

या अपघातात दिपेंद्र कुमार, दिनेश कुमार, रतनलाल कुमावत, जयराम कुंभार, महादेव कुंभार, राजेंद्र प्रजापती, सिताराम कुमार, मुकेश गुजर, लक्ष्मी जांगेड आणि दोन अनोळखी असे १२ जण जखमी झाले आहे. शेवटची वृत्त हाती आले तेव्हा एरंडोल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. संबंधीत बस ही श्री चौधरी ट्रॅव्हल्स या कंपनीची होती.

या बसचा क्रमांक एआर ०१ वाय ०००९ हा होता. पोलिसांनी या संदर्भात बस चालकाकडून माहिती मिळवून तपास करण्यास प्रारंभ केला आहे. तर, जखमी प्रवाशांच्या आप्तांना देखील माहिती देण्यात आली आहे.

Previous articleमहापौर जयश्री महाजन यांना फुटबॉल संघटना व खेळाडू तर्फे निरोप
Next articleहतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले; तापी वाहतेय दुथडी, जळगाव जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here