Home जळगाव महापौर जयश्री महाजन यांना फुटबॉल संघटना व खेळाडू तर्फे निरोप

महापौर जयश्री महाजन यांना फुटबॉल संघटना व खेळाडू तर्फे निरोप

75
0

आशाताई बच्छाव

IMG-20230916-WA0069.jpg

महापौर जयश्री महाजन यांना फुटबॉल संघटना व खेळाडू तर्फे निरोप

खान्देश विभागीय संपादक, योगेश पाटील.

महानगरीच्या प्रथम नागरिक श्रीमती जयश्री महाजन यांचा महापौर पदाचा कार्यकाळ आज संपत आल्याने श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे जळगाव जिल्हा फुटबॉल संघटना तर्फे फुटबॉल खेळाडू च्या माध्यमाने व माजी जिल्हा सरकारी वकील तथा वकील संघटनेचे अध्यक्ष एडवोकेट केतन ढाके यांच्या अध्यक्षतेखाली निरोप देण्यात आला. संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी साने गुरुजी लिखित मराठी इस्लामी संस्कृतीचे पुस्तक व शाल देऊन त्यांचा गौरव केला.

महापौर चषक स्पर्धेची खंत
महापौर फुटबॉल चषक ही स्पर्धा घेण्याचे महापौर जयश्री महाजन यांनी अभिवचन दिले होते परंतु काही कारणांनी महापौर चषक घेता आले नाही, अशी खंत फारुक शेख यांनी निरोप समारंभात व्यक्त केली. तसेच भविष्यात आपण जरी महापौर पदावर नसल्या तरी आपण क्रीडा क्षेत्रात ज्याप्रमाणे कामगिरी केली, त्याप्रमाणे करून आम्हा क्रीडा संघटनाना सहकार्य करावे अशी आग्रहाची विनंती केली.
क्रीडा क्षेत्राला नेहमी सहकार्य राहणार – महापौर जयश्री महाजन यांनी निरोप समारंभ घेताना फुटबॉल संघटनेचे सचिव शेख यांनी व्यक्त केलेल्या भावनांशी सहमत असून भविष्यात सुद्धा क्रीडा संघटनांना सहकार्य राहील, तसेच महापौर चषक फुटबॉल स्पर्धा घेता आल्या नसल्या तरी त्या लवकरच कोणत्यातरी बॅनरखाली घेऊ असे सांगताच उपस्थित मुलं व मुलींनी त्यांच्या या घोषणेचे टाळ्या वाजवून स्वागत केले.

एडवोकेट केतन ढाके यांनी जयश्री महाजन यांना भावी राजकीय आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. निरोप समारंभाचे आभार फुटबॉल संघटनेचे सहसचिव अब्दुल मोहसीन यांनी मानले. महापौर जयश्री महाजन यांना पुस्तक व शाल देऊन निरोप देताना फारुक शेख सोबत ॲडव्होकेट केतन ढाके, सौ शारदा सोनवणे, अब्दुल मोहसीन व खेळाडू दिसत आहे.

Previous articleभारत सरकारचे केंद्रीय मंत्री मा.नितिनजी गडकरी यांनी दिपाली व अंजली राठोड यांना दिला चर्चेसाठी वेळ
Next articleजिल्ह्यात भीषण अपघात : प्रवासी बस पलटली; दोन ठार !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here