Home नांदेड भारत सरकारचे केंद्रीय मंत्री मा.नितिनजी गडकरी यांनी दिपाली व अंजली राठोड यांना...

भारत सरकारचे केंद्रीय मंत्री मा.नितिनजी गडकरी यांनी दिपाली व अंजली राठोड यांना दिला चर्चेसाठी वेळ

64
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230914-204432_WhatsApp.jpg

भारत सरकारचे केंद्रीय मंत्री मा.नितिनजी गडकरी यांनी दिपाली व अंजली राठोड यांना दिला चर्चेसाठी वेळ

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

नागपूर :
नागपूर येथील दिपाली व अंजली राठोड आठव्या व नवव्या वर्गात शिकत असून कोणत्याही खाजगी शिकवणीशिवाय शालेय अभ्यासात अव्वल दर्जा सातत्यपूर्ण कायम ठेवला आहे. शालेय अभ्यासाशिवाय अनेक स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग असतो हे उल्लेखनिय आहे.आरोग्यदायी कुटूंबासाठी जैविकशेती या विषयांवर राष्ट्रीय स्तरांवर सादरीकरण झाल्यानंतर अनेक शाळां,महाविद्यालय आणि सामाजिक संस्थेत त्यांचे उत्कृष्ट सादरीकरण झालेले आहे. या प्रवासात अनेकांचे मार्गदर्शन त्यांना प्राप्त झाले.केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या संकल्पनेतील मध्य भारतातील सर्वात मोठ्या अॅग्रो व्हिजन कार्यक्रमातही परभणी कृषि विद्यापिठाचे कुलगुरु राहीलेले,सरकारच्या अनेक समित्यांवर राहून कार्य केलेले आणि भारतातील नामवंत कृषी शास्त्रज्ञ डॉ. सि.डी.माई पुढाकाराने आरोग्यदायी परीवारांसाठी परसबाग, छतावरील बगीचा या विषयांवर पहिल्यांदा कमी वयाच्या शालेय विद्यार्थी दिपाली व अंजली राठोड यांना संधी मिळाली. अॅग्रो व्हिजन कार्यक्रमात प्रभावीपणे सादरीकरण झाले. दोघींचे वाचन, चिंतन,चर्चा वाढल्याने ज्ञानात भर पडली.आजपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर त्यांच्या प्रयोगाला प्रत्यक्ष भेट दिले आहेत.जैविकशेती या विषयांवर दिपाली व अंजली राठोड यांनी एका इंग्रजी भाषेतील पुस्तकांचे लेखनही त्यांनी पूर्ण केले असून लवकर त्याचा प्रकाशन सोहळा ते आयोजन करणार असल्याचे समजते. त्यांनी केलेल्या प्रयोगांवर,पुस्तकांवर चर्चा करण्यासाठी त्यांना केंद्रीय मंत्र्याचा वेळ मिळावा हा स्वाभीमानाचा व कौतुकाचा विषय आहे. दिपाली व अंजली श्रीपत राठोड यांच्या ज्वलंत व जिव्हाळ्याच्या विषयावरील कार्य व पुस्तक लेखनाच्या धाडसाची सर्वत्र दखल घेतली जात आहे.

Previous articleराणा दातांचे बेताल वक्तव्य; १०० कोटीचा अब्रू नुकसानाचा दावा ठोकणार?,आ. यशोमती ठाकूर यांची रोखठोक भूमिका.
Next articleमहापौर जयश्री महाजन यांना फुटबॉल संघटना व खेळाडू तर्फे निरोप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here