Home उस्मानाबाद तामलवाडीत लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंची जयंती उत्साहात साजरी

तामलवाडीत लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंची जयंती उत्साहात साजरी

70
0

आशाताई बच्छाव

IMG-20220801-WA0053.jpg

युवा मराठा न्यूज उस्मानाबाद ब्युरो चीफ श्री नागेश शिंदे                                                    तामलवाडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102वी जयंती साजरी.
तामलवाडी- तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळांच्या वतीने 102 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी मंडळांच्या वतीने तामलवाडी येथील जिल्हा परिषद शाळा येथे तिसरी व चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आली व त्या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन रोख रक्कम व एक झाड, महापुरुषांचे पुस्तके सुयोग फाऊंडेशन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ यांच्या वतीने देण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे तामलवाडी पोलिस स्टेशनचे पी एस आय आर बी घुले साहेब, सरपंच सौ.मंगल गवळी, सुयोग फाऊंडेशनचे डॉ.रविराज गायकवाड, आदर्श शिक्षिका सौ.ज्ञानेश्वरी शिंदे मॅडम, डॉ.स्मिता लोंढे मॅडम ,सुमन ताई डोलारे, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब रणसुरे,सुधीर पाटील,माजी सदस्य आनंदा रणसुरे, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन सुधाकर लोंढे, प्रहार संघटनेचे तालुका संघटक सचिन शिंदे,मराठा ऑर्गनायझेशन तालुका सचिव नागेश शिंदे, संतोष वाघमारे, विवेक वाघमारे, सचिन कसबे, निलेश कसबे, धोंडिबा कसबे, कोंडिबा कसबे,लहु कसबे, पांडुरंग कसबे, शिवाजी भालकवडे, रोहिदास डोलारे,रोहण डोलारे, दिलीप डोलारे किसन कसबे, मसाजी कसबे, नाभिक टायगर सेनेचे सदस्य बबन राऊत.
या कार्यक्रमाचे आयोजन मंडळांचे अध्यक्ष बाळासाहेब डोलारे, उपाध्यक्ष, विशाल कसबे, सचिव योगेश डोलारे यांनी योगदान दिले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते भरपुर प्रमाणात उपस्थित होते.

Previous articleमराठी अस्मितेचा घोर अपमान सर्व राजकीय पक्ष्यांकडून कोश्यारीं यांच्यावर टीकास्त्र
Next articleअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना त्वरित मदत द्या खा.अशोकजी नेते.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here