Home धाराशिव श्री ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरी येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा. 

श्री ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरी येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा. 

1217

आशाताई बच्छाव

1002117121.jpg

श्री ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरी येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा.                            धाराशिव जिल्हा प्रतिनिधी: दि.२५ ऑक्टोबर २०२५ रोजी रोजी श्री ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरी येथे “माझी शाळा माझा अभिमान” या घोषवाक्याखाली माजी विद्यार्थी मेळावा अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीमती अरुणाताई देविदासराव जाधव -माडीवाले यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव तथा मा. मुख्याध्यापक भातलोंढे सर होते .मा. मुख्याध्यापक एस .वाय .जाधव सर, मा. मुख्याध्यापक एच.व्ही पवार सर, मा.मुख्याध्यापक एन.एम.माने सर, गठडे सर, राठोड सर, आर.जी. माने सर, देशमाने सर ,तेगाडे सर,के .एन जाधव सर,बी.एस. जाधव सर ,शिवाजी जाधव सर , ज्ञानेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अहिरे मॅडम, पर्यवेक्षक मुरमे मॅडम,मोहिते मॅडम,अभिजित जाधव सर ,कल्पना मॅडम, उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ, ट्रॉफी देऊन स्वागत करण्यात आले. मा. मुख्याध्यापकांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत, शाळेची यशस्वी वाटचाल मांडली. माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली . २००३-२००४ माजी विद्यार्थ्यांच्या वतीने एकुरगावाडी येथील तुळजाभवानी अपंग मतिमंद अनाथ मुलांचे(बालगृह) येथे अन्नदान आणि कार्यक्रमातून उर्वरित रक्कम देण्यात आली. हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी संतोष जाधव, निलकंठ लुगदे,शरद कदम, सुवर्णा जाधव, गोदावरी अंबुलगे, शिवकन्या स्वामी, शिल्पा पवार,सोनाली कांबळे,गिरीष तपसाळे,अमर शिंदे, अतुल जाधव, कृष्णा पाटील,बाबा पवार, अतुल मोरे, प्रकाश साळूंके, राहुल सुर्यवंशी, प्रफुल्ल साठे, विशाल वासगी,कमल जाधव, ज्ञानेश्वर मुचळंबे,गोविंद लवटे, आप्पा लवटे, निखिल माणिकवार,शकिल मुरमे,हाजी पिरजादे,गजू तपसाळे, शुभांगी भोसले, ज्योती गायकवाड, मनिषा जाधव -तळभोगे, ललिता राठोड,कोमल कांबळे, शिल्पा माळी, चंद्रकांत पाटील, विठ्ठल पाटील, महेश पाटील, महेश थोरे, अभिजित इंगळे, चंद्रकांत टोंम्पे, सिताराम तांबोळकर,गुंडू लेंडवे, गणेश गायकवाड,लक्ष्मण जाधव ,सोम कस्तुरे यांच्या सह सर्वांनी प्रयत्न केला.

Previous articleसोनईतील संजय वैरागर अमानुष मारहाण प्रकरणी दलित संघटनांचे तीव्र निदर्शने — आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
Next articleसमाजसेवी रोहित पाचफुले यांना राष्ट्रीय स्तरावरील ‘देश रत्न’ पुरस्कार जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.