Home जालना समाजसेवी रोहित पाचफुले यांना राष्ट्रीय स्तरावरील ‘देश रत्न’ पुरस्कार जाहीर

समाजसेवी रोहित पाचफुले यांना राष्ट्रीय स्तरावरील ‘देश रत्न’ पुरस्कार जाहीर

395

आशाताई बच्छाव

1002117150.jpg

समाजसेवी रोहित पाचफुले यांना राष्ट्रीय
स्तरावरील ‘देश रत्न’ पुरस्कार जाहीर
===========
दिल्लीत डिसेंबरमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते गौरव
जालना -वसंतराव देशमुख
दिनांक २६/१०/२०२५
समाजकार्य, जनजागृती आणि वंचित घटकांच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असणारे जालना येथील सामाजिक कार्यकर्ते रोहित मनोजराव पाचफुले यांची केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत भारत युवा वेलफेयर असोसिएशनतर्फे प्रतिष्ठेच्या ‘देश रतन पुरस्कार 2025’ साठी निवड झाली या निमित्ताने जालनाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 23 डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित राष्ट्रीय सन्मान सोहळ्यात देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
‘रिअल हीरोज ऑफ इंडिया’ या उपक्रमांतर्गत देशभरातील ग्रामीण व झोपडपट्टी क्षेत्रात समाजाभिमुख काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो. यंदा या श्रेणीमध्ये देशातील अनेक दावेदारांमधून रोहित पाचफुले यांच्या सातत्यपूर्ण व प्रभावी समाजकार्याची दखल घेण्यात आली आहे. या सोहळ्यात केंद्रीय खाद्यप्रक्रिया मंत्री चिराग पासवान, कौशल्य वि