• Home
  • 🛑 मुंबईच्या डबेवाल्यांसमोर दुहेरी संकट 🛑

🛑 मुंबईच्या डबेवाल्यांसमोर दुहेरी संकट 🛑

🛑 मुंबईच्या डबेवाल्यांसमोर दुहेरी संकट 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕मुंबईचे मॅनेजमेंट गुरू म्हणून ख्याती असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांसमोर कोरोनामुळे सध्या आर्थिक गाडा कसा हाकायचा हा प्रश्न उभा ठाकला आहे. मात्र कोरोनामुळे मुंबईच्या डबेवाल्यांसमोर दुहेरी संकट आल्याचे परिस्थिती समोर आली आहे.

मुंबईतील डबेवाले हे त्यांच्या ढोल-ताशा पथकांसाठीदेखील प्रसिद्ध आहेत. यंदा मात्र उत्सव काळात सर्व मंडळांनी साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे निश्चित केल्याने या ढोल-ताशा पथकांच्या माध्यमातून मिळणाऱया आर्थिक मदतीला मुंबईचे डबेवाले मुकणार आहेत.त्यामुळे मुंबईच्या डबेवाल्यांसमोर आता नव्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

मुंबईत आणि पुण्यात गणेशोत्सव काळात गेल्या काही दिवसांत ढोल ताशा पथकांना प्रचंड मागणी आहे.

मुंबईतील डबेवाले हे मूळचे मावळ पट्टय़ातील असल्याने मुंबईत आणि पुण्यात साधारणपणे 20 ते 30 ढोल ताशा पथके डबेवाल्यांकडून चालकिले जातात. ढोल ताशा पथकांच्या निमित्ताने मुंबईतील डबेवाल्यांना आर्थिक हातभारदेखील मिळतो.

त्याशिवाय डबेवाल्यांकडून या ढोलताशांच्या पथकांतून मिळणाऱया पैशांमार्फत अनेक समाजोपयोगी कार्यक्रमदेखील राबविले जातात. ज्यात प्रामुख्याने मंदिराचे जीर्णेद्वार असो, ग्रामीण भागात मदतीचे कार्यक्रम असो, यासारखे अनेक वेळा मुंबईच्या डबेवाल्यांकडून मदतीचा हात पुढे केला जात होता. यंदा कोरोनामुळे मुंबईच्या डबेवाल्यांसमोर अगोदरच चिंतेचे वातावरण आहेत. त्यात आता नवी भर पडली आहे. मुंबईत आणि पुण्यात यंदा जवळपास सर्वच मंडळांनी आगमन आणि विसर्जन मिरकणूक रद्द करीत साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईच्या डबेवाल्यांना यंदा या ढोल ताशा पथकांच्या माध्यमातून मिळणारा निधीला यंदा मुकावे लागणार आहे.

या ढोल ताशा पथकांच्या माध्यमातून दोन तास वाजवण्याची 15 ते 20 हजार रुपये बिदागी ढोल ताशा पथकांना मिळते. अशा प्रकारे प्रत्येक उत्सव काळात ढोल पथक लाखो रूपये कमाई होत असे या कमाईला आता मुकावे लागणार आहे..

ढोल ताशा पथकांच्या माध्यमातून मुंबईतील डबेवाले आपल्या संस्कृतीचे जतन करतात.

पण यंदा कोरोनामुळे मुंबईचे डबेवाले डबघाईला आले आहेत. त्यामुळे आमच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने अनुदान देऊन आम्हांला मदत करावी
– सुभाष तळेकर ..⭕

anews Banner

Leave A Comment