Home विदर्भ वाशिम जिल्ह्याचा सपुत्र श्री सानप मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पदी नियुक्ती मेडशी...

वाशिम जिल्ह्याचा सपुत्र श्री सानप मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पदी नियुक्ती मेडशी गावचे जावाई

162
0

राजेंद्र पाटील राऊत

वाशिम जिल्ह्याचा सपुत्र श्री सानप मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पदी नियुक्ती

मेडशी गावचे जावाई

 

. मालेगाव तालुका प्रतिनिधी प्रकाश भुरे : वाशिम जिल्ह्यातील भर जाहगीर येथील शेतकरी परिवारातील श्री जी. ए. सानप मुंबई न्यायाधीश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांचा जन्म भर जाहगीर येथील एका शेतकरी कुटुंबात दि. 24 – 2 – 1963 मध्ये झाला. वडील आनंदराव विठोबा सानप हे शेतकरी होते. ग्रामीण भागात शिक्षण पहली ते दहावी गावीच झाले. बारावी रिसोड येथे. नंतर ग्राजूएट वाशिम येथे तर एल. एल. बि. अकोला येथे मिरीट मध्ये आले.
1990 ते 93 मध्ये वाशिम जिल्हा सत्र न्यायालयात येथे प्रॅक्टिस केली. 93 ते 96 मध्ये मालेगाव येथे प्रॅक्टिस केली. 1996 त्यांची न्यायाधीश लघुवाद न्यायालय मुंबई येथे प्रथम नियुक्ती झाली. 2008 मध्ये त्यांची जिल्हा न्यायाधीश पदी पदोन्नती झाली. 2010 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात प्रबंधक म्हणून त्यांची बदली झाली. 2011 मध्ये शहर दिवाणी व सत्र न्यायालय मुंबई येथे त्यांची बदली झाली. तेथे त्यांची टाडा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली त्यांनी 2011 ते 2017 पर्यंत 1993 चा मुंबई बॉम्बस्फोट खटला चालविला तसेच या काळात त्यांनी टाडा कायद्याअंतर्गत इतरही महत्त्वाचे खटले चालविले 2017 मध्ये त्यांनी मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल दिला. त्यांनी 26/11 रोजी झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचे खटल्याचे कामकाज चालविले त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने डेव्हिड हेडली या अमेरिकी नागरिकांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माफीचा साक्षीदार म्हणून साक्ष नोंदविली त्यानंतर 2018 मध्ये त्यांची जळगाव येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पदी नेमणूक झाली तेथे त्यांनी दोन वर्ष काम केले. मागील एक वर्षापासून ते महाराष्ट्र सहकार अपील न्यायालय याचे यांचे याचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. दि. 25 जुन 2021 शुक्रवार रोजी न्यायाधीश श्री जी. ए. सानप यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. यांच्या निवडीने वाशिम जिल्ह्या मधुन अभिनंदन केले जात आहे. तर मेडशी येथील श्री माणिकराव घुगे यांचे जावाई आहेत. न्यायाधीश सानप यांचा मुलगा, मुलगी, जावाई हायकोर्टाचे वकील आहेत.
तर मेडशी येथील घुगे परिवार व मेडशी वाशीयां कडुन अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Previous articleराजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादनानंतर —————————————— आज आरक्षण कृती समितीचा आक्रोश मोर्चा
Next articleमालेगाव येथे चक्का जाम अंदोलन भाजपा कार्यर्कत्या कडुन करण्यात आले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here