*सटाणा तालुक्यात एका तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या* *
डांगसौंदाणे,(योगेश्वर बहिरम प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-सटाणा तालुक्यातल्या मोठे साकोडे गावात आज सकाळी एका तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या दोन दिवसापूर्वी याच भागात प्रेमीयुगलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचे प्रकरण ताजे असतानाच आज बुधवारी सकाळी मोठे साकोडे ता.सटाणा येथील तरुण रवींद्र(महादू)यशवंत साबळे वय १८वर्ष याने साकोडे गावाच्या शिवारातील गट नं.७८मध्ये आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केली.या घटनेचा पंचनामा डांगसौंदाणे औट पोस्टचे हवालदार जाधव आणि शिरसाठ यांनी केला.यावेळी पोलिस पाटील नंदन देशमुख व सरपंच रामचंद्र बहिरम यांचेसह ग्रामस्थ घटनास्थळावर उपस्थित होते.आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
