• Home
  • अद्याप शाळा-कॉलेज सुरू करण्यासाठी कोणतीही परवानगी नाही; केंद्रीय गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण !

अद्याप शाळा-कॉलेज सुरू करण्यासाठी कोणतीही परवानगी नाही; केंद्रीय गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण !

  • ⭕अद्याप शाळा-कॉलेज सुरू करण्यासाठी कोणतीही परवानगी नाही; केंद्रीय गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण !⭕
    ( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

सध्या काही दिवसांपासून शाळा-कॉलेज सुरू होणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच अनेकांना शाळा-कॉलेज कधी सुरू होणार? असे अनेकांना प्रश्न पडले आहेत. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्टीकरण दिले असून देशभरातील शाळा- कॉलेज तसेच शैक्षणिक संस्थांना सुरू करण्यासाठी परवानगी दिली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवाय याबाबत राज्यांना कोणतेही निर्देश देण्यात आले नाहीत. त्यामुळे अफावांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केंद्रीय गृहमंत्रालयाने केले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्गापासून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. देशभरातील मार्च महिन्यापासून शाळा-कॉलजे बंद आहेत. त्यामुळे सध्या शाळा-कॉलेज कधी सुरू होणार? असे अनेक जण प्रश्न विचारत आहे. त्याचेच उत्तर केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने ट्विट करून शाळा- कॉलेज सुरू करण्यासाठी अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच देशभरातील सर्व शैक्षणिक संस्थांवर अद्यापही निर्बंध कायम असल्याचे सांगितले आहे.

अशा परिस्थितीत शाळा सुरू केल्यातरी विद्यार्थ्यांना पालक पाठविणार नाही. लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे सध्या शासनाने ऑनलाईन शिक्षणावरच अधिक भर देण्याची गरज आहे. तसेच अद्याप शाळा सुरू करण्यासंदर्भातील सविस्तर अध्यादेश प्रसिद्ध झालेला नाही. येत्या १५ जून पासून शाळा-कॉलेज सुरू करण्यास विरोध दर्शविला जात आहे.

anews Banner

Leave A Comment