• Home
  • BPCL ग्राहकांसाठी खुशखबर! आता WhatsApp वरून बुक करु शकता ‘सिलिंडर

BPCL ग्राहकांसाठी खुशखबर! आता WhatsApp वरून बुक करु शकता ‘सिलिंडर

⭕BPCL ग्राहकांसाठी खुशखबर! आता WhatsApp वरून बुक करु शकता ‘सिलिंडर ⭕
मुंबई :(विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

मुंबई :- भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (BPCL) कंपनीने ग्राहकांसाठी खुशखबर दिली आहे. त्यामुळे देशातील लाखो ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. सध्या देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊन सुरु असताना देखील कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने 5 व्या लॉकडाऊनची तयारी सुरु असतानाच कंपनीकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता देशभरात घरबसल्या आपल्याला सिलिंडर बुक करता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करून तुम्हाला सिलिंडर घरबसल्या बुक करता येणार आहे.
देशातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची पेट्रोलियम वितरण कंपनी म्हणून BPCL ही कंपनी ओळखली जाते.
याशिवाय कंपनीचे 1.70 कोटी एलपीजी ग्राहक आहेत. मंगळवारपासून देशभरातील भारत गॅस ग्राहक व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून कुठूनही सिलिंडर बुक करु शकतात अशी घोषणा मंगळवारी करण्यात आली आहे.

काय आहे प्रक्रिया ?
कंपनीकडून बीपीसीएल स्मार्टलाइन नंबर देण्यात आला आहे. 1800224344 हा नंबर आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह करा आणि आपल्या मोबइल नंबरच्या व्हॉट्सअ‍ॅपवरून या नंबरवर बुकिंसाठी मेसेज पाठवा. बीपीसीएलचे मार्केटिंग संचालक अरुण सिंह म्हणाले, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एलपीजी बुकिंग करण्याची ही तरतूद ग्राहकांना अधिक सोयीस्कर वाटणार आहे. तरुणांपासून वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाकडे व्हाट्सअ‍ॅप आहे. त्यामुळे या माध्यमाचा वापर करून आम्ही जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू.

असे करता येणार पेमेंट
व्हॉट्सअ‍ॅपवरून बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना एक मेसेज येईल. त्यामध्ये एक लिंक दिलेली असेल. या लिंकवर जाऊन ग्राहकांना आपली पेमेंट प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ऑनलाईनपद्धतीने हे पेमेंट करण्यात येईल. एलपीजी डिलिव्हरीवर लक्ष ठेवणे व त्याबद्दल ग्राहकांकडून त्यांचा अभिप्राय घेण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. येत्या काही दिवसांत आणखी नवीन योजना आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी सुविधा आणण्याचा कंपनी प्रयत्नात असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

anews Banner

Leave A Comment