Home नाशिक सभामंडप व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न

सभामंडप व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न

87
0

आशाताई बच्छाव

IMG-20220826-WA0053.jpg

सभामंडप व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न
नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे
आमदार सुहास आण्णा यांच्या माध्यमातून तसेच सौ.अंजुम ताई कांदे यांच्या विशेष प्रयत्नाने नागेश्वर चौक येवला रोड येथील श्री लक्ष्मी माता मंदिर परिसरात सभामंडप व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन आज संपन्न झाले.
श्री कृष्ण ध्यान मंदिराचे महंत व श्री खामानिकर बाबा (कणाशी), ह.भ.प.ढगे बाबा आणि भाबड बाबा यांच्या शुभहस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
काही दिवसापूर्वी आमदार सुहास कांदे यांच्या धर्मपत्नी सौ.अंजुम ताई कांदे यांनी या परिसरातील नागरिकांनी सौ.अंजुम ताई कांदे lयांना मंदिर परिसरात सभामंडप व सुशोभीकरण करण्याची मागणी केली होती, अंजुम ताई यांनी तत्काळ मंदिरास भेट देऊन महिलांना त्वरित हे काम करण्याचा शब्द दिला होता. या नुसार आज या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी आमदार सुहास आण्णा कांदे यांचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे, महीला आघाडी शहराध्यक्ष रोहिणी मोरे, सुनील मेंगनर, जीवन पगार, अमोल शिंदे, सुदेश मानकर, योगेश गायकवाड, सुनील सोर, भरत पारख, निशांत बोडके, सोनू माळी, ज्ञानेश्वर गायकवाड,अविनाश बागोरे, राहुल गरुड, मनोज थोरात, मेधा मेंगनर, शिंदे बाई, जिजाबाई कोळेकर अलका कुमावत, शुभांगी कदम, जिजाबाई देवरे, हिराबाई खैरनार, खैरे, खंडेराव, गरुड, शिंदे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here