Home राजकीय भा.ज.पा.चे आमदार, खासदार आजही राजभवनावर

भा.ज.पा.चे आमदार, खासदार आजही राजभवनावर

93
0

⭕भा.ज.पा.चे आमदार, खासदार आजही राजभवनावर⭕
मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई :- कोरोना स्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची तक्रार करण्यासाठी भा.ज.पा. नेत्यांनी आजही राजभवनावर हजेरी लावली. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे आणि आमदार राहुल कुल यांनी राजभवनावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भा.ज.पा.ची मागणी नाही, असे भा.ज.पा. नेत्यांनी जाहीर केले आहे. तरीही राज्यपालांकडे तक्रारीसाठी रोजचा कार्यक्रम कायम ठेवून भा.ज.पा.ने सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न कायम ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज्यपालांकडे निवेदन द्यायला गेलेले नेते हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आहेत. या तीन नेत्यांनी राज्यपालांना निवेदन देऊन त्यांना कोरोनाच्या प्रश्नी तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली. राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशामध्ये कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने उग्ररूप धारण केलं असताना देशाच्या कोरोना रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार ही परिस्थिती हाताळण्यात अत्यंत बेफिकीर दिसत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर बनत चालली असताना, राज्य सरकारने कोणतेही ठोस निर्णय घेतलेले दिसत नाहीत. मोलमजुरांचा प्रश्न असेल, कोरोना रुग्णांच्या संदर्भात हॉस्पिटलमध्ये असणारी दुरवस्था, रेशन वाटप, व्यवसाय सुरू करण्याबाबत प्रक्रिया याबाबतीत सरकारमध्ये कसलाही समन्वय नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकमेकांच्या विरोधामध्ये निर्णय घेताना दिसत आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.

Previous articleBPCL ग्राहकांसाठी खुशखबर! आता WhatsApp वरून बुक करु शकता ‘सिलिंडर
Next articleइथेही मृतदेह.. केईएम रुग्णालयातील कोरोना उपचारांदरम्यानचं धक्कादायक वास्तव
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here