• Home
  • इथेही मृतदेह.. केईएम रुग्णालयातील कोरोना उपचारांदरम्यानचं धक्कादायक वास्तव

इथेही मृतदेह.. केईएम रुग्णालयातील कोरोना उपचारांदरम्यानचं धक्कादायक वास्तव

⭕इथेही मृतदेह.. केईएम रुग्णालयातील कोरोना उपचारांदरम्यानचं धक्कादायक वास्तव⭕
मुंबई :(विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई : देशामध्ये Coronavirus कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्याऱ्या महाराष्ट्र राज्यातील मुंबईत कोरोनाची पकड दिवसागणिक आणखी मजबूत होताना दिसत आहे. परिणामी नागरिकांमध्ये याबाबतची दहशत पाहायला मिळत आहे. दरदिवशी वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान उभं करत आहे. ज्यामुळे आता रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या उपचारांदरम्यान हेळसांड होत असल्याचं दाहक वास्तव समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वीच सायन आणि केईएम रुग्णालयातील रुग्णांच्या उपचारांदरम्यान दिसणारा बेजबाबदारपणा सोशल मीडिया व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांसमक्ष आला होता. ज्यात भर म्हणून पुन्हा एकदा मुंबईच्या केईएम रुग्णालयातील एक भयावह व्हिडिओ धक्का देत आहे.

एका रुग्ण महिलेनेच हा व्हिडिओ शूट केला आहे. राम कदम यांनीही ट्विटरच्या माध्यमातून हा व्हि़डिओ पोस्ट करत उद्धव ठाकरे प्रशासनाकडे या दुरावस्थेसाठीचे प्रश्न उपस्थित केले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रुग्णांच्या भोवताली णृतदेह दिसत असून, रुग्णाला जमिनीवर झोपवून उपचार सुरु असल्याचं दिसत आहे. इतकंच नव्हे तर, या वॉर्डमध्ये प्रचंड अस्वच्छता दिसत असून, कोरोनापासून दूर राहण्यासाठी म्हणून वारंवार सांगितल्या जाणाऱ्या सोशल डिस्टन्सिंगचाही येथे फज्जा उडाल्याचं दिसत आहे.

एका रुग्णाकडूनच चित्रीत करणाऱ्या या व्हिडिओमध्ये उद्विग्नता स्पष्टपणे दिसत आहे. रुग्णालय प्रशासनाला सांगितलं असताल आपल्याला फक्त उडवाउडवीचीच उत्तरं मिळत असल्याचं या रुग्णांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून संतप्त भावांसह सांगण्यात येत आहे. जगण्यासाठीचा संघर्ष सुरु असणाऱ्या या परिस्थितीमध्ये रुग्णालय प्रशासनाचा हा ढिसाळ कारभार पाहता इथे रुग्ण बरे होणार तरी कसे हाच प्रश्न उभा राहत आहे.

anews Banner

Leave A Comment