Home मुंबई बृहन्मुंबई माध्यमिक व माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटना आयोजित अध्यक्षीय दिन सत्कार समारोह...

बृहन्मुंबई माध्यमिक व माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटना आयोजित अध्यक्षीय दिन सत्कार समारोह सोहळा उत्साहात संपन्न.

59
0

आशाताई बच्छाव

IMG_20240203_220446.jpg

बृहन्मुंबई माध्यमिक व माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटना आयोजित अध्यक्षीय दिन सत्कार समारोह सोहळा उत्साहात संपन्न.
सविता तावरे-मुंबई स्पेशल न्यूज रिपोर्टर
दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबई( बृहन्मुंबई) माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटना आयोजित अध्यक्ष दिन सोहळा दुपारी दोन वाजता सुरुवात झाली. सदर सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून कैसर खालिद साहेब अतिरिक्त पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य , मुंबई विभागाचे लोकप्रिय आमदार कपिल पाटील साहेब तसेच धर्मेंद्र नाईक साहेब शिक्षण उपनिरीक्षक जोगेश्वरी (पूर्व) हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. सदर सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर साहेब हे उपस्थित राहणार होते परंतु त्यांना मराठी साहित्य संमेलनानिमित्त जळगाव या ठिकाणी जावे लागले सदर कार्यक्रमास मंत्री महोदयांनी शुभेच्छा दिल्या .तसेच कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार सन्माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर शारीरिक अस्वस्थामुळे कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत परंतु त्यांच्याकडून देखील संघटनेच्या या कार्यक्रमास शुभेच्छा देण्यात आल्या

कार्यक्रमाची सुरुवात बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेचे मुंबई विभागाचे सचिव व महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ते कै. प्रशांत रमेश रेडीत सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन करण्यात आली. स्वर्गीय प्रशांत सर यांनी संघटनेसाठी केलेले कार्य हे अविस्मरणीय आहे त्यांनी सर्वच स्तरातील लोकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे .तसेच राज्यातील हजारो शिक्षकांना अनुदान मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे असा अवलिया पुन्हा होणे शक्य नाही म्हणून त्यांच्या कार्याला सलाम व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

कार्यक्रमाचे मुख्य अतिथी कैसर खालिद सर यांनी मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कलागुण कसे शोधवे. तसेच आपले काम करत असताना मुख्याध्यापकानीं कोणत्या बारीक-सारीक गोष्टी लक्षात घ्याव्यात हे अतिशय मौलिक शब्दात सांगितले. खालीद सर यांचे वक्तृत्व प्रभावी होतेच परंतु उपस्थित मुख्याध्यापक वर्ग त्यांच्या या वकृत्व शैलीने भारावून गेला. त्यांनी आपले विद्यार्थी हे सर्व गुणसंपन्न घडायला हवेत तसेच ते सर्व क्षेत्रात अग्रेसर राहतील यासाठी आपल्या परीने आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे . सर्वच विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता एकसारखी नसल्या कारणामुळे ज्या विद्यार्थ्यांना खेळ, साहित्य नृत्य, गायन या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्रात त्यांना सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. हे देखील आवर्जून सांगितले यावेळी त्यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे उदाहरण दिले. मुख्याध्यापकांना देखील शाळा व शाळेतील सर्व घटक यांना सांभाळावे लागते हे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर मुंबई विभागाचे लोकप्रिय आमदार श्री कपिल पाटील सर यांनी उपस्थित मुख्याध्यापकांचे त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल कौतुक केले आणि आपल्या सर्वांच्या हातून उत्तम कार्य घडत राहावे. चांगली संस्कारक्षम पिढी घडवण्याचे काम आपण उत्तम रीतीने करत आहात याचा मला आमदार म्हणून सार्थ अभिमान आहे असे त्यांनी सांगितले.तसेच मुख्याध्यापकांना अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. आपण सर्वजण त्या उत्तम सांभाळत आहात याचा मला विश्वास आहे .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष सन्मा. मनोहर देसाई सर यांनी उत्तम केले. मुख्याध्यापक संघटनेत काम करत असताना मुख्याध्यापकांना येणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यासाठी संघटने कडून वेगवेगळ्या नवनवीन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. व यापुढे देखील संघटनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमातून मुख्याध्यापकांना शैक्षणिक कार्य करत असताना येणाऱ्या विविध अडचणींबाबत शिबिरांचे आयोजन करून ज्या अडचणी येतात त्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले.
संघटनेचे उपाध्यक्ष तुकाराम सवादेकर सर यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना आपण सर्वजण मुंबई मुख्याध्यापक संघटनेच्या अध्यक्ष दिन सोहळ्यात उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमत: सर्वांचे स्वागत केले आणि मुंबई मुख्याध्यापक संघटनेत कोणत्याही प्रकारचे गट अस्तित्वात नसून मनोहर देसाई सर यांच्या अध्यक्षतेखालील मुख्याध्यापक संघटना हीच आपल्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी पुढे राहील असे सांगितले. जोपर्यंत नवीन कार्यकारणी तयार होत नाही तोपर्यंत सध्याच्या कार्यकारणी मध्ये असलेल्या पदाधिकाऱ्यांकडून मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक या सर्व घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील .त्यामुळे आपण सर्वजण एकत्र येऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढ हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन ते साध्य करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करूयात. बृहन्मुंबई माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेचे माजी अध्यक्ष श्री. नलावडे सर,श्री. रमाकांत पांडे सर,श्री. मंजूर अहमद सर, श्री.बागवान सर,श्री शंकर पवार सर, दिलशाद थोबानी मॅडम हे उपस्थित होते. त्यांनी देखील पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. संघटनेचे माजी अध्यक्ष सतीश चिंदरकर सर हे त्यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त जळगाव या ठिकाणी गेले असल्या कारणामुळे सदर कार्यक्रमाचे उपस्थित राहू शकले नाही.
यानंतर मुंबई विभागातील उत्तर, दक्षिण व पश्चिम या तीनही विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या मुख्याध्यापकांचा कौतुक सोहळा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कैसर खालीद सर तसेच मुंबई विभागाचे आमदार कपिल पाटील साहेब यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापकांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा संघटनेचे सर्व पदाधिकारी व तीनही विभागातील जिल्हा कार्यकारणी यांनी उपस्थिती लावली.
सदर कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचे, मुख्याध्यापकांचे तसेच पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापकांचे बृहन्मुंबई माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेकडून मनपूर्वक हार्दिक अभिनंदन !अभिनंदन!

Previous articleरांजणीत ‘नमो चषक’चे दिमाखदार आयोजन आयोजन : ४ फेब्रुवारी थाटात होणार उद्घाटन
Next articleकाँग्रेसच्या जंगली डुकरांना झटका देण्याची गरज: भाजपा खासदार डॉ. अनिल बोंडे यांची काँग्रेसवर प्रखर टीका.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here