Home उतर महाराष्ट्र महामारीच्या काळात रेशनिंगचा काळाबाजार करत होते; तिघाजणांना कर्जत पोलिसांनी केली अटक! १०...

महामारीच्या काळात रेशनिंगचा काळाबाजार करत होते; तिघाजणांना कर्जत पोलिसांनी केली अटक! १० लाख ४४ हजार रुपयांचा माल जप्त !

146
0

राजेंद्र पाटील राऊत

महामारीच्या काळात रेशनिंगचा काळाबाजार करत होते; तिघाजणांना कर्जत पोलिसांनी केली अटक! १० लाख ४४ हजार रुपयांचा माल जप्त !
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

अहमदनगर जिल्ह्यात रेशनचा काळाबाजार करण्याची हि भयानक हि घटना झाली उघड
महामारीच्या काळात रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, फौजदार भगवान शिरसाट यांच्या पथकाने अटक केली. या तिघाजणांकडून दोन चारचाकी वाहनांसह ८८ पोती धान्य असा दहा लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
राशीन कर्जत रस्त्यावर सागर हॉटेल समोर काहीजण शासकीय स्वस्त धान्य दुकानाचे धान्य घेऊन काळाबाजार करून त्याची विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली. त्यांनी नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना तातडीने याची माहिती दिली.त्यांच्या मार्गदर्शनाखाली यादव यांनी फौजदार शिरसाठ, हवालदार तुळशीदास सातपुते, मारुती काळे, भाऊसाहेब काळे, संभाजी वाबळे, सागर म्हेत्रे, संपत शिंदे, देविदास पळसे, शाहूराज तिकडे यांचे पथक तयार करून करमाळ्याचे तहसीलदार समीर माने, कर्जतचे तहसीलदार नानासाहेब सागळे, तलाठी प्रशांत गौडचर यांना याची माहिती दिली.यानंतर सागर हॉटेल समोर आलेल्या बाळासाहेब दादासाहेब ढेरे, रेवणनाथ मुरलीधर ढेरे व श्रीकांत प्रकाश अहिरे (सर्व रा. वीट ता. करमाळा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता हा सर्व धान्य स्वस्त धान्य दुकानातील असल्याचे लक्षात आले. स्वस्त धान्य दुकानात आलेला तांदूळ आणि गहू नागरिकांना न देता काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी त्यांनी आणला होता. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आले आहे. पुढील तपास फौजदार शिरसाठ करत आहेत.

Previous articleसोलापूर जिल्ह्यात येत्या ७ दिवसासाठी कडक लाॕकडाऊन
Next articleअजमीर सौंदाणेला उद्या लसीकरण;जिल्हा परिषद सदस्या लताताई बच्छाव यांच्या प्रयत्नांना यश!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here