Home नांदेड देगलूर रा.कॉं.पार्टिच्या वतीने करण्यात आले इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन – वाहनधारकांना पेढे...

देगलूर रा.कॉं.पार्टिच्या वतीने करण्यात आले इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन – वाहनधारकांना पेढे व फुल देवून निषेध

153
0

राजेंद्र पाटील राऊत

देगलूर रा.कॉं.पार्टिच्या वतीने करण्यात आले इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन – वाहनधारकांना पेढे व फुल देवून निषेध

नांदेड प्रतिनिधी / राजेशNभांगे

केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमती प्रचंड वाढविलेल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडल्यामुळे या भाववाढीच्या निषेधार्थ देगलूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने शहर कार्यालय येथून चंद्रभागा पेट्रोल पंपा पर्यंत दि.५ जुलै रोजी मोदी सरकार विरूध्द प्रचंड घोषणेबाजी देत मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करून वाहन धारकांना पेढे व फुल देऊन तीव्र निषेध करण्यात आला.व उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन भाववाढ त्वरीत कमी करण्याची मागणी करण्यात आली
केंद्र सरकारने गॅस, पेट्रोल-डिझेल या इंधनाच्या वस्तूमध्ये प्रचंड वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांतून या भाव वाढीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांच्या सुचनेवरून देगलूर शहरामध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार म्हणाले की, मागील युपीए सरकारच्या काळात गॅस प्रति सिलेंडर ४०० रूपये होता आज त्याचे भाव दुप्पट आहे. तसेच पेट्रोल ७० रूपये होते ते आता १०७रूपये प्रति लिटर झाले.
डिझेल ५० रू.प्रति लिटर होते ते ९५ रू.प्रति लिटर झाले. तसेच इतर खाद्य पदार्थाचे तेल, दाळ व कडधान्याचे भाव प्रचंड वाढले आहे. सर्वसामान्य जनता महागाईच्या चटक्याने होरपळून निघत आहे.
केंद्र सरकारने ही भाववाढ त्वरीत मागे घ्यावी, यावर नियंत्रण आणावे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध केला.
तर यावेळीइंधनाच्या किंमती कमी कराव्यात या संदर्भातील निवेदन उपजिल्हाधिकार्‍यां मार्फत प्रधानमंत्री मोदी यांना पाठविण्यात आले.

या आंदोलनात कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्‍यांनी मोदी सरकार विरूध्द प्रचंड घोषणेबाजी दिली व तीव्र भावना मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश देशमुख शिळवणीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार,तालुकाध्यक्ष अंकुश देसाई देगावकर, विधानसभा अध्यक्ष बालाजी रोयलावार, शहराध्यक्ष आसीफ पटेल, नगरसेवक अविनाश निलमवार,विलायत आली काजी, मल्लन रेड्डी, अल्पसंख्यांक तालुकाअध्यक्ष सय्यद मोहीयोदीन अहमदसाब, नगरसेवक तुळशीराम संगमवार, नगरसेवक रामचंद्र मैलागीर, नगरसेवक निसार देशमुख, संजय चिन्मवार, सुनिल येशमवार, शैलेंद्र चव्हाण, लक्ष्मण कंधारकर ,हणमंत देशमुख,दत्तू अण्णा जोशी ,संजय मंगलावार, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत मोरे, शहराध्यक्ष सुमीत कांबळे, शिवकुमार डाकोरे, बंडू शिंदे, हबीब रहेमान, गजानन कांबळे,शेख अहेसान, अच्युत पाटील कदम, नागेश बक्कनवार, शुभम इंगळे,सुजीत सुर्यवंशी,पींटु जोशी,सचिन पाटील झरीकर, शेख मोईन, सचिन पाटील, नागेश बक्कनवार,सय्यद खलील, मिलींद कावळगावकर,अनिल कोंडेकर,योगेश मैलागीरे, प्रदीप गडपवार, आशिष पवार, ओमकार उल्लेवार,अबू खुरेशी,अमोल येशमवार,प्रतीक देशमुख,रवी गवळी, सुमित कांबळे, सुजित कांबळे,सय्यद नाविद, इरफान देशमुख, कृष्णा माळेगााकर, मोईन मिस्त्री यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here