Home नांदेड एम .सी .एल. आणि मराठवाडा शेतकरी बायोफ्यूल्स यांच्या संयुक्त विद्यमाने जाहूर येथे...

एम .सी .एल. आणि मराठवाडा शेतकरी बायोफ्यूल्स यांच्या संयुक्त विद्यमाने जाहूर येथे लवकरच जैवइंधन निर्मिती प्रकल्प उभारणार -प्रल्हाद पाटील बोडके

465
0

राजेंद्र पाटील राऊत

एम .सी .एल. आणि मराठवाडा शेतकरी बायोफ्यूल्स यांच्या संयुक्त विद्यमाने
जाहूर येथे लवकरच जैवइंधन निर्मिती प्रकल्प उभारणार -प्रल्हाद पाटील बोडके
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मीरा क्लीन फ्युएल लिमिटेड( एम. सी .एल. )ही कंपनी जैवइंधन निर्मिती क्षेत्रात उतरली असून या कंपनीच्या माध्यमातून तालुक्यातील जाहूर येथे मराठवाडा शेतकरी बायोफ्यूल्स प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीने जैवइंधन निर्मिती प्रकल्प लवकरच उभारला जाणार असून हा प्रकल्प भविष्यामध्ये शेतकऱ्यांना वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन मराठवाडा शेतकरी बायॉफ्यूल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चेअरमन प्रल्हाद पाटील बोडके यांनी केले.
एमसीएल आणि मराठवाडा शेतकरी बायो फ्यूल्स प्रायव्हेट लिमिटेड मुखेड आणि म्रष्णेश्वर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणाचा रक्षण आणि संवर्धन आणि शेतकऱ्याचा विकास या उद्देशासाठी स्थापन झालेली कंपनी असून या कंपनीच्या उभारणीच्या प्रक्रियेला वेग आला असून शेतकऱ्यांच्या भाग भांडवलातून व सदस्य नोंदणीतून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जैवइंधन, सेंद्रिय खत, विद्युत निर्मिती ही उत्पादने लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असून यामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू असून शेतकऱ्याकडून कच्चा जैविक माल घेऊन त्यापासून ही सर्व उत्पादने तयार होणार असल्याने भविष्यात तालुक्यातील शेतकऱ्यांना सदरची कंपनी ही वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन या कंपनीचे चेअरमन तथा कार्यकारी संचालक प्रल्हाद पाटील बोडके यांनी केले आहे .
धनज तालुका मुखेड येथे आज तालुक्यातील ग्राम प्रकल्प एम. व्ही. पी .सभासदांची कार्यशाळा घेण्यात आली .
यावेळी अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त तहसीलदार माननीय पांडुरंग बेलोटे ग्राम प्रकल्प प्रमुख देवी भोयरे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे सदस्य बालाजी पाटील सकनुरकर, राम पाटील चांडोळकर हे उपस्थित होते.
प्रारंभी भारतरत्न ,मिसाईल मॅन, एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यशाळेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी कार्यशाळेचे प्रास्ताविक बिल्लाळी
चे माजी सरपंच अंतेश्वर पाटील कदम यांनी केले .या कार्यशाळेला देवीभोयरे येथील ग्राम प्रकल्पाचे प्रमुख श्री बेलोटे साहेब यांनी सविस्तर असं मार्गदर्शन केले उपस्थित सर्व शेतकरी प्रतिनिधींच्या विविध प्रश्नांचे योग्य आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने निरसन केले .यावेळी त्यांनी उपस्थित शेतकरी प्रतिनिधीशी मुक्त संवाद साधला या एमसीएल या जैवइंधन निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकर्यांना रोजगार ,त्याचबरोबर बी बियाणे खते सेंद्रिय खते ,आणि शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करण्याची हमी या सर्व बाबी त्याचबरोबर शेतीवर आधारित पूरक व्यवसायालाही चालना मिळणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली कंपनीच्या माध्यमातून सर्व सभासदांना सवलतीच्या दरामध्ये बी-बियाणे सेंद्रिय खते आणि शेतकऱ्यांच्या कच्चामाल हमीभावाने खरेदी करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली हा जैवइंधन निर्मिती प्रकल्प लवकरच तालुक्यामध्ये जाहुर येथे उभारला जाणार असून या प्रकल्पाच्या सभासद नोंदणी कार्यक्रम सुरू असून तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपली नोंदणी करावी असे आवाहन कंपनीचे कार्यकारी संचालक तथा चेअरमन प्रल्‍हाद पाटील बोडके यांनी यावेळी बोलताना केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत बोडके यांनी केले तर आभार संतोष पाटील इंगळे यांनी मानले.

Previous articleदेगलूर रा.कॉं.पार्टिच्या वतीने करण्यात आले इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन – वाहनधारकांना पेढे व फुल देवून निषेध
Next articleदेवळा येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here