Home उतर महाराष्ट्र पुणे ते भुसावळ पर्यंत धावणारी एक्‍स्प्रेस आता दौंड ते भुसावळ धावणार   ...

पुणे ते भुसावळ पर्यंत धावणारी एक्‍स्प्रेस आता दौंड ते भुसावळ धावणार       

208
0

राजेंद्र पाटील राऊत

पुणे ते भुसावळ पर्यंत धावणारी एक्‍स्प्रेस आता दौंड ते भुसावळ धावणार                         (▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

पुणे आणि भुसावळदरम्यान धावणारी विशेष साप्ताहिक रेल्वे 29 जुलैपर्यंत दौंड ते भुसावळदरम्यान धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पुणे-भुसावळपर्यंत धावणारी साप्ताहिक एक्‍स्प्रेस 27 मे ते 29 जुलै या कालावधीत दौंड-भुसावळ-दौंडदरम्यान धावणार आहे. 29 जुलैपर्यंत दर गुरुवारी एक्‍स्प्रेस भुसावळहून सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी सुटणार असून, दौंड येथे 3 वाजून 10 मिनिटांनी पोहोचणार आहे.
तर, दौंडहून दर गुरुवारी एक्‍स्प्रेस 12 वाजून 30 मिनिटांनी सुटणार असून, 8 वाजून 45 मिनिटांनी पोहोचणार आहे. जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर या स्थानकांत थांबणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here