Home विदर्भ पंतप्रधान किसान सन्मान चा आठवा हफ्ता उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा –...

पंतप्रधान किसान सन्मान चा आठवा हफ्ता उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा – अजिंक्य मेडशीकर

210
0

राजेंद्र पाटील राऊत

पंतप्रधान किसान सन्मान चा आठवा हफ्ता उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा – अजिंक्य मेडशीकर                                                                                                                    मालेगांव,( चंद्रकांत गायकवाड तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क विदर्भ)

शेतकरयांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली.
सदर योजना केंद्र सरकारच्या विहित केलेल्या निकषानुसार आणि या संदर्भात वेळोवेळी केंद्र शासना कडून प्राप्त होणाऱ्या निर्देशप्रमाणे राज्यात राबविण्यास मंत्री मंडळाच्या दि 04-02-2019 रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली
किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. जे दर चार महिन्यांनी 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. यावेळी 1 एप्रिलपासून शेतकऱ्यांचा हप्ता थकीत होता. कारण आधी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे आठवा हफ्ता लांबणीवर पडला होता आणि आता कोविड -19 मुळे सरकार त्यांच्या नियंत्रणामध्ये व्यस्त आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)च्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाईन पेमेंट केले जाते.
मात्र मे महिन्या मध्ये काही शेतकरी वर्गाच्या खात्यात पैसे जमा केले तर काही शेतकरी अजून ही सन्मान निधी अंतर्गत 2000 मिळण्याचे प्रतीक्षेत आहे.
आता काही दिवसा मध्ये पाऊस सुरू होऊन पेरणीस सुरुवात होईल आणि त्या आगोदर जर हे पैसे भेटले असते तर त्यांचा शेतकर्याला निश्चित त्याचा फायदा झाला असता किंवा पेरणी पूर्व मशागत करण्यासाठी ह्या पैश्यामुळे काही प्रमाणात का होइना पण आर्थिक स्वरूपाचा हातभार लागला असता.

Previous articleपुणे ते भुसावळ पर्यंत धावणारी एक्‍स्प्रेस आता दौंड ते भुसावळ धावणार       
Next articleछावा संघटनेच्या अध्यक्षांनी घेतली मा.खा.धनंजय महाडीकांची भेट
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here