Home मुंबई बुद्ध पौर्णिमेनिमित्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपालांना दिली बुद्ध मूर्ती भेट

बुद्ध पौर्णिमेनिमित्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपालांना दिली बुद्ध मूर्ती भेट

151
0

राजेंद्र पाटील राऊत

बुद्ध पौर्णिमेनिमित्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपालांना दिली बुद्ध मूर्ती भेट

(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुंबई दि. २६ – कोरोना च्या संकटकाळात भगवान बुद्धांची करुणा आमच्या सोबत आहे. सर्वांनी करुणा आपल्या मनी बाळगावी असे आवाहन महाराष्ट्र् राज्याचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांनी केले. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज बौद्ध पौर्णिमेनिमित्त राज भवन येथे राज्यपाल यांची भेट घेऊन सुंदर बुद्ध मूर्ती सप्रेम भेट दिली. या वेळी कमानी ट्युबस कं च्या बुद्ध पौर्णिमा कॅलेंडर चे राज्य पालांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

शांती शिवाय विकास नाही. भगवान बुद्धांचा धम्म हा समतेवर आधारित आहे.शांती अहिंसा करुणा या तत्वांवर आधारलेला बौद्ध धम्म संपूर्ण जगात प्रसारित झाला आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जगात सर्वश्रेष्ठ असा बौद्ध धम्म दिला याचा आम्हाला अभिमान आहे असे प्रतिपादन यावेळी ना रामदास आठवले यांनी केले.

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय सामाजिक न्याय व आधिकारिता राज्यमंत्री भारत सरकार मा.ना.रामदासजी आठवले साहेब अाज २६ मे २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता विश्वशांती दुत, तथागत गौतम बुध्द यांच्या २५६४ व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल मा.भगतसिंगजी कोश्यारी यांची राजभवन येथे शुभेच्छा भेट घेण्यात आली. ना.रामदासजी आठवले यांच्या वतीने बुध्दांची मूर्ती भेट देण्यात अाली. या प्रसंगी बौध्द धर्मगुरु भिक्खुंना चिवरदान करण्यात आले.
यावेळी भन्ते विररत्न, भन्ते कश्यप, मा.कल्पना सरोज, मा.आशिष देशपाडे, मा.घनश्याम चिरणकर, मा.प्रविण मोरे अाणि मा.महेश लंकेश्वर उपस्थित होते.

Previous articleवाखारी येथे भगवान गौतम बुद्ध यांची जंयती साजरी
Next articleपुणे ते भुसावळ पर्यंत धावणारी एक्‍स्प्रेस आता दौंड ते भुसावळ धावणार       
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here