Home बुलढाणा एकात्मिक बाल विकास अंतर्गत होणाऱ्या अंगणवाडी मधील मुलांच्या विकासाला अपंगत्व

एकात्मिक बाल विकास अंतर्गत होणाऱ्या अंगणवाडी मधील मुलांच्या विकासाला अपंगत्व

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220724-WA0061.jpg

एकात्मिक बाल विकास अंतर्गत होणाऱ्या अंगणवाडी मधील मुलांच्या विकासाला अपंगत्व

युवा मराठा न्यूज वेब पोर्टल रवी शिरस्कार संग्रामपूर शहर

ग्रामपंचायत दुर्गादैत्य येथील अंगणवाडी मध्ये लहान मुलांची जवळपास 26 ते 27 पटसंख्या असून सदर अंगणवाडीची दैनिय अवस्था झालेली आहे 15 वित्त आयोगातून ग्रामपंचायत मार्फत अंगणवाडीला यावर्षी टेबल व खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती पण मात्र सदर अंगणवाडी मध्ये पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही, लाईटची व्यवस्था नाही, मुलांना आहार शिजवण्याकरिता गॅस सिलेंडरची सुद्धा व्यवस्था नाही आहार सेविका त्याच्या घरून शिजवून आणतात,तसेंच मुलांना बसण्याकरिता योग्य अशी व्यवस्था नाही मागील दिवसात होणाऱ्या सतत धार पावसामुळे अंगणवाडीचा हॉल पूर्णपणे गळल्यामुळे मुलांना बसताच आले नाही, बऱ्याच दिवसापासून अंगणवाडी हॉल मध्ये पूर्वेस भले- मोठे भगदाड पडले आहे स्लॅब हा पडल्यागत झालेला असल्यामुळे मुलांना पाठवण्याकरिता लाभार्थी पाल्यांना भीती निर्माण झालेली आहे. या सर्व अडचणीची सूचना अंगणवाडी सेविकांनी ग्रामपंचायत यांना कळविलेले असुन गेले कित्तेक दिवसांपासून करून टाकू- करून टाकू असे होकारार्थी उत्तरे मिळत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे *एकात्मिक बाल विकास योजनेतील विकासाला जणु अपंगत्व आल्याचे दिसून येत आहे*.
एकात्मिक बाल विकास अंतर्गत लाभार्थी मुलांना मिळालेला धान्याचा दर्जा हा खाण्यायोग्य नसुन त्या धान्यावर बुरशी निर्माण झालेली दिसून आले तसेच वाटप करण्यात येणाऱ्या एकात्मिक बालविकास योजनेच्या आहाराच्या प्रमाणात एकसूत्रता नसल्याने मुले तो आहार पूर्ण सेवन करीत नाही.
तरी शासनाच्या एकात्मिक बाल विकास मार्फत तसेच ग्रामपंचात मधील मिळणाऱ्या अनेक योजनांच्या मार्फत रखडलेल्या अंगणवाडीला सहकार्य करण्याचे आवाहन गावकऱ्यांमार्फत होत आहे.

Previous articleपाच महसुल मंडळातील तब्बल चार-हजार-आठशे- एकोणीस हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांचे नुकसान
Next articleखामगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह शाखेचे वरवट बकाल येथे ग्राहक संपर्क अभियान संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here