Home बुलढाणा खामगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह शाखेचे वरवट बकाल येथे ग्राहक संपर्क अभियान संपन्न

खामगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह शाखेचे वरवट बकाल येथे ग्राहक संपर्क अभियान संपन्न

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20220724-WA0062.jpg

खामगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह शाखेचे वरवट बकाल येथे ग्राहक संपर्क अभियान संपन्न

युवा मराठा न्यूज पेपर वेब पोर्टल रवि शिरस्कार संग्रामपूर शहर

एकीकडे आर्थिक क्षेत्रात व्याजदर वाढत असताना ग्राहकांचे हित लक्षात घेऊन व्याजदर कमी करण्याचे धाडसी पाऊल खामगाव अर्बन बँकेने उचलले आहे ह्या विविध सुविधा व योजनांची सविस्तर माहिती देण्यासाठी ग्राहक संपर्क अभियानाचे आयोजन दि. 22जुलै ला वरवट बकाल येथे करण्यात आले होते कार्यक्रमात बँकेचे अध्यक्ष प्रबंध संचालक तसेच पालक संचालक यांनी विविध योजना व सुविधांची माहिती ग्राहकांना दिली या योजनांमध्ये गृह कर्ज योजना, वाहन तारण कर्ज योजना,लघुउद्योमी कर्ज योजना, सोलर कर्ज योजना, स्त्रियांकरिता स्त्रीशक्ती लघुउद्योमी कर्ज योजना, लहान व्यावसायिकां करिता विशेष कर्ज योजना त्याच प्रमाणे वर्षातून एकदा राबवण्यात येणारी उत्सव कर्ज योजना याबद्दल माननीय अध्यक्ष आशिषजी चोबीसा यांनी उपस्थित ग्राहकांना मार्गदर्शन केले व या योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले. ग्राहकांचे प्रतिनिधित्व करत श्री गणेश कारोडे व लोकेश राठी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तसेच सद्या स्थितीत बँक करत असलेल्या कार्याबद्दल समाधानी व्यक्त केली. ग्राहकांनी यावेळी आपल्या समस्या व शंका माननीय अध्यक्षांना विचारून त्या शंकाच समाधान देखील करून घेतलं कार्यक्रमाचे संचालन गोपाल गांधी यांनी केले तसेच आभार प्रदर्शन योगेश भाऊ गायकवाड यांनी केले, कार्यक्रमच्या शेवटी चहा व फराळ करतेवेळी वरवट शाखेचे पालक संचालक राजपूत यांनी यांनी दो कदम तुम भी चलो दो कदम हम भी चले हे गीत सादर केले. यावेळी खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री आशिष जी चोबीसा, प्रबंध संचालक, सुधीरजी कुलकर्णी, पालक संचालक वरवट बकाल शाखा राजेंद्र सिंह राजपूत तसेच वरवट बकालच्या प्रथम नागरिक महिला सरपंच माननीय प्रतिभाताई इंगळे तसेच शाखेचे स्थानिक सल्लागार समितीतील सर्व सदस्य व असंख्य नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous articleएकात्मिक बाल विकास अंतर्गत होणाऱ्या अंगणवाडी मधील मुलांच्या विकासाला अपंगत्व
Next articleप्रसिद्ध हवामान अंदाजक पंजाब डख यांचा शेतकरी मार्गदर्शक मेळावा अफाट संख्येने संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here