Home मराठवाडा चिकट गाव येथे, दुर्गा देवीचे विसर्जन

चिकट गाव येथे, दुर्गा देवीचे विसर्जन

327
0

राजेंद्र पाटील राऊत

चिकट गाव येथे, दुर्गा देवीचे विसर्जन                               ब्युरो चीफ: बबन निकम औरंगाबाद –गणपती उत्सवानंतर नवरात्रोत्सव प्रारंभ झाला आहे दिनांक07/10/2021 गुरुवार पासून पासून चिकट गाव येथे परंपरागत पद्धतीने धार्मिक विधी पूर्ण करून नवरात्रोत्सवास सुरुवात झाली, चिकटगाव येथे सार्वजनिक दुर्गा मंडळांने देवीची स्थापना केली, नवरात्रोत्सव निमित्ताने गावातील प्रत्येक घराघरात घटस्थापना केली जाते, नवरात्री सणानिमित्त नऊ दिवस मनोभावे धार्मिक विधी केला जातो, दररोज सकाळी- सायंकाळी दुर्गादेवीची आरती केली जाते ,दहाव्या दिवशी देवीचा भंडारा केला जातो, त्यामध्ये सर्व गावकऱ्यांना जेवण दिले जाते परंतु यावर्षीचा भंडारा हा covid-19 चे नियम पाळून साजरा केला असे दुर्गादेवीच्या संचालक मंडळाने सांगितले, दिनांक 17/ 10 /2021 रविवार रोजी सायंकाळी ठीक सात वाजता वाजत गाजत मिरवणूक काढून देवीचे विसर्जन करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका युवक उपाध्यक्ष श्री विक्रांत निकम यांनी नवरात्री उत्सव साजरा करण्यामागची आख्यायिका सांगितली ही एक पौराणिक कथा आहे, महिषासुर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि वरदान मागितले की विश्वातील कोणताही देव राक्षस किंवा पृथ्वीवरील मनुष्य त्याला मारू शकत नाही किंवा हरवू शकत नाही हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुरा ने दहशत निर्माण करायला सुरुवात केली, त्याची दहशत थांबविण्यासाठी दुर्गा देवी शक्ती च्या रूपाने जन्माला आली दुर्गा देवी आणि महिषासुर यांच्यातील युद्ध नऊ दिवस चालले आणि दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला अशाप्रकारे पौराणिक कथा सांगून देवीचे विसर्जन करण्यात आले या प्रसंगी दुर्गादेवी मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य भक्तगण विसर्जन आरतीला उपस्थित होते

Previous articleमुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नामदेव यलकटवार तर सचिव अनिल कांबळे तसेच कोषाध्यक्षपदी चरणसिंह चौहान यांची बिनविरोध निवड.
Next articleसह्याद्री प्रतिष्ठाण कडून धर्मवीरगड दुर्गापुजन कार्यक्रम संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here