• Home
  • लॉकडाऊन कालावधीत जप्त केलेली वाहने परत करा

लॉकडाऊन कालावधीत जप्त केलेली वाहने परत करा

⭕लॉकडाऊन कालावधीत जप्त केलेली वाहने परत करा ⭕
पुणे : ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे -: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. आता चौथा लॉकडाऊन सुरू झाला आहे. यापूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये जप्त केलेल्या पुणेकरांच्या ३० ते ४० हजार गाड्या परत देण्याची मागणी पुणे बार असोसिएशन कार्यकारिणी सदस्य आनंद धोत्रे आणि आकाश मुसळे यांनी पत्राद्वारे, तसेच ट्विट करून पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्याकडे केली आहे. पहिल्या आणि दुसर्‍या लॉकडाऊनमध्ये विनाकारण आणि इतरत्र फिरत असताना पोलिसांनी या गाड्या जप्त केल्या आहेत.

शहरात कंटेन्मेंट भाग वगळता अन्य भागात हळूहळू व्यवहार सुरू झाले आहेत. कोरोनासोबतच नियमांचे पालन करीत नोकरी, कामधंदा सुरू होणार आहे. सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद असल्याने नागरिक स्वतःच्या वाहनांवर अवलंबून असल्याने त्यांना वाहनाअभावी कामकाजाकरिता कार्यालय, व्यवसायाच्या ठिकाणी जाणे शक्य होणार नाही. पोलिसांनी जप्त केलेली वाहने ४० ते ५० दिवसांपासून एकाच ठिकाणी रस्त्यावर, पोलीस ठाण्याच्या आवारात वापराविना पडून आहेत. बॅटरी, इंजिन, टायर इ. खराब होण्याची दाट शक्यता आहे. पावसामुळे वाहनांचे नुकसानदेखील होऊ शकते. वाहनाचे नुकसान झाल्यास नागरिकांना दुरुस्तीकरिता नाहक खर्चाला आणि त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवश्यक त्या उपाययोजना करून कायद्याच्या चौकटीत वाहने परत देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी अ‍ॅड. आनंद धोत्रे व अ‍ॅड. आकाश मुसळे यांनी केली आहे.

anews Banner

Leave A Comment