Home कोरोना ब्रेकिंग चाणाक्ष महिला सरपंच !मुंबईतून आलेल्या 6 जणांना घरातच कोंडलं, 6 जणांचे अहवाल...

चाणाक्ष महिला सरपंच !मुंबईतून आलेल्या 6 जणांना घरातच कोंडलं, 6 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

83
0
  1. ⭕चाणाक्ष महिला सरपंच !मुंबईतून आलेल्या 6 जणांना घरातच कोंडलं, 6 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह!⭕
    लातूर- ( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

लातूर -: मुंबईहून विना परवानगी घेता आलेल्या संपूर्ण कुटुंबाला निलंगा तालुक्यातील कोराळी येथे गावच्या महिला सरपंच गायकवाड यांनी घरातच कोंडून ठेवले. काही दिवसांनी त्यांची वैद्यकीय चाचणी केली असता ते 6 जण कोरोनाबाधित असल्याचं स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली. मात्र महिला सरपंचांच्या हुशारीमुळे मोठा अनर्थ टळला. त्यांच्या संपर्कात कुणीही आलं नाही.

कोराळी येथील कुटुंबीय गेल्या अनेक वर्षापासून मुंबईत राहत होते. या कुटुंबाच्या नात्यातील एकाचा मुंबईत आठ दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती गावातील सरपंच, ग्रामसेवकांना मिळाली होती. अशातच हे कुटुंब कोणताही परवाना न घेता शनिवारी गावी आले आणि घरी लपून बसले. महिला सरपंच गायकवाड यांना हा प्रकार कळताच त्यांनी या कुटुंबाच्या घराला बाहेरून कुलूप लावून ठेवले आणि सकाळी त्या कुटुंबाला रुग्णालयात पाठवले.
निलंगा येथील रुग्णालयातून कुटुंबातील सदस्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवल्यानंतर काल सायंकाळी त्यांचा अहवाल आला. त्यावेळी 6 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाले. ही माहिती मिळताच तहसीलदार गणेश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी श्रीनिवास कदम, यांनी कोराळी गावास भेट देऊन परिसर सील केला.
दरम्यान, सरपंचांनी सतर्कता दाखवून योग्य वेळीच त्या कुटुंबाला घरात कोंडून ठेवल्यामुळे हे कुटुंब गावातील कुणाशी संपर्कात आले नाही, अशी भावना आता गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Previous articleकरुन दाखवलं! होम क्वारंटाईनसाठी खासदारांनी दिलं चक्क स्वतःचं घर !- धैर्यशील माने
Next articleलॉकडाऊन कालावधीत जप्त केलेली वाहने परत करा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here