Home कोरोना ब्रेकिंग करुन दाखवलं! होम क्वारंटाईनसाठी खासदारांनी दिलं चक्क स्वतःचं घर !- धैर्यशील माने

करुन दाखवलं! होम क्वारंटाईनसाठी खासदारांनी दिलं चक्क स्वतःचं घर !- धैर्यशील माने

113
0

⭕करुन दाखवलं! होम क्वारंटाईनसाठी खासदारांनी दिलं चक्क स्वतःचं घर !- धैर्यशील माने ⭕
( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

कोल्हापूर -: खासदार धैर्यशील माने यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांनी नागरिकांना एक आवाहन केलं होतं…. होम
क्वारंटाईनसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी स्वतःचं घर दिलं आहे. कोल्हापुरातल्या रुकडी येथे असणारे आपले घर त्यांनी होम क्वारंटाईनसाठी दिलं आहे.होम क्वारंटाइनसाठी स्वतःचं घर देणारे धैर्यशील माने हे देशातील एकमेव खासदार म्हणावे लागतील. त्यामुळे अलगीकरणाच्या नव्या कोल्हापुरी पॅटर्नची सुरुवातच त्यांनी केली आहे.खासदार धैर्यशील माने यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांनी नागरिकांना एक आवाहन केलं होतं. एखादा व्यक्ती परजिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात येत असेल तर त्याला संबंधित ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण करण्यात येते. मात्र त्यांचा निगेटीव्ह अहवाल आल्यानंतर त्यांना आता त्यांच्या घरी जायची सोय केली जाणार आहे. संबंधित व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीची घरीच सोय करण्यात येणार आहे. मात्र घरातील सदस्यांनी मात्र आपल्या भावकीत किंवा शेजाऱ्यांच्यात काही दिवस राहण्यासाठी जावे, असे आवाहन केले होते. आवाहन केल्यानंतर त्यांनी सुरुवात स्वतःपासूनच केली आहे. त्यांच्या अभिनव अशा कल्पनेनंतर प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
ग्रामस्तरीय समितीच्या प्रभावी कामाला मदत होणार असून कुटुंबाला आणि पर्यायाने गावाला सुद्धा कोणताच धोका होणार नाही, अशा पद्धतीमुळे अलगीकरणाचे नियमांचं तंतोतंत पालण होण्यास सहकार्य करावं. शिवाय सामाजिक एकोपा आणि एकमेकांमधील नाती आणखी दृढ होतील, असे खासदार धैर्यशील माने यांनी म्हटलं आहे. खासदार माने यांच्या या अभिनव कल्पनेचे जिल्ह्यातील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Previous articleअति आत्मविश्वास आणि बेफिकरी भोवली ! मृत्युच्या दाढेतून परत आलोय – जितेंद्र आव्हाड
Next articleचाणाक्ष महिला सरपंच !मुंबईतून आलेल्या 6 जणांना घरातच कोंडलं, 6 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here