• Home
  • अति आत्मविश्वास आणि बेफिकरी भोवली ! मृत्युच्या दाढेतून परत आलोय – जितेंद्र आव्हाड

अति आत्मविश्वास आणि बेफिकरी भोवली ! मृत्युच्या दाढेतून परत आलोय – जितेंद्र आव्हाड

  • ⭕ अति आत्मविश्वास आणि बेफिकरी भोवली ! मृत्युच्या दाढेतून परत आलोय – जितेंद्र आव्हाड⭕
    मुंबई ( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

मुंबई : राज्याचे बांधकाम मंत्री जितेंद्र आव्हाड हे नुकतेच कोरोनावर मात करून आले आहेत. गेले काही दिवस ते रुग्णालयात होते. यावेळी कोणत्या आव्हांना समोर जाव लागल आणि तो अनुभव कसा होता. कुटुंबावर काय परिस्थिती आली होती. हा सारा अनुभव जितेंद्र आव्हाड यांनी दै. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. यावेळी त्यांनी मी मृत्यूच्या दाढेतून उमेद घेऊन परतलोय, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. तर अतिआत्मविश्वास आणि बेफिकरी भोवली असल्याचं ही ते म्हणाले.आव्हाड यांनी सांगितलेली हकीगत, कोरोनाची लागण झाल्याने चार दिवस मी व्हेंटिलेटरवर होतो. त्यावेळी डॉक्टरांनी माझ्या जगण्याची केवळ ३० टक्केच शक्यता असल्याचे सांगितले होते. तशी माहिती त्यांनी माझ्या मुलीला दिली; परंतु डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आणि माझ्या मुलीने दिलेल्या जगण्याच्या उमेदीमुळे मी आज पुन्हा तुमच्यात आलो.हॉस्पिटलमध्ये असताना मी माझ्या मुलीला नताशाला व्हिडिओ कॉल केला तेव्हा घरातील सर्व मंडळी मला दिसत होती; पण माझी पत्नी मला तिथे दिसत नव्हती. त्यामुळे मी पत्नीची चौकशी करताच मुलीने मला सांगितले की, ती बाजूच्या खोलीत आहे; परंतु ती तिथे नव्हती, तर तीसुद्धा रुग्णालयात कोरोनाशी लढा देत होती. माझी मुलगी त्या क्षणाला प्रसंगावधान राखून माझ्याशी खोटं बोलली. आज जेव्हा मी या घटनेचा विचार करतो तेव्हा कमी वयात तिची मॅच्युरिटी पाहून मला सुखद धक्का बसला.
तो सगळा प्रसंग आठवला तरी मन आजही हळवे होते. आता पुन्हा नव्या उमेदीने सुरुवात करताना आयुष्यात खाण्यापिण्याची शिस्त बाळगण्याचे व अतिआत्मविश्वास न ठेवण्याचे, बेफिकिरीने न वागण्याचे मी निश्चित केले आहे.रुग्णालयात मी व्हेंटीलेटरवर असताना त्या तीन ते पाच दिवसात काय काय घडामोडी घडल्या, हे मला काहीच माहित नाही. कारण त्या पाच दिवस माझी मृत्युशी झुंज सुरु होती, असे आव्हाड म्हणाले.

anews Banner

Leave A Comment