• Home
  • विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! दहावी-बारावीचे पेपर होणार

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! दहावी-बारावीचे पेपर होणार

⭕ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! दहावी-बारावीचे पेपर होणार ⭕
( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली : देशभरात दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना या निर्णयाची माहिती कळविली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, मोठ्या संख्येने असलेल्या दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाउनच्या कालावधीत काही अटींवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. यात सोशल डिस्टन्सिंग, चेहऱ्याला मास्क लावणे, थर्मल स्क्रीनिंग आणि सॅनिटायझरचा वापर आदी. अटींचा समावेश आहे. या अटी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आहेत.

गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात पत्र पाठविले आहे.
केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला म्हणाले की, दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी शाळांवरील निर्बंध काही काळ उठविण्यात आले आहेत. राज्य शिक्षण मंडळे, सीबीएसई, आयसीएसईकडून होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा लॉकडाउनमुळे शाळा बंद करण्यात आल्याने स्थगित करण्यात आल्या होत्या.

या परीक्षा घेण्यासाठी अनेक राज्ये आणि सीबीएसईने केंद्र सरकारकडे विनंती केली होती. यावर अखेर गृह मंत्रालयाने निर्णय घेतला आहे. मात्र, बाधित क्षेत्रात (कंटेन्मेंट झोन) कोणतेही परीक्षा केंद्र असणार नाही आणि विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणे बंधनकारक असेल, असेही गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

वेगवेगळ्या बोर्डांकडून परीक्षा घेण्यात येणार असल्या तरी यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी बस उपलब्ध करुन द्याव्यात. या बसमधून परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची वाहतून करण्यात यावी, असेही गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
देशातील लॉकडाउन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरूवातीला २४ मार्चपासून २१ दिवसांसाठी जाहीर केले. त्यानंतर ते ३ मेपर्यंत आणि पुन्हा १७ मेपर्यंत वाढविण्यात आले. आता हे लॉकडाउन ३१ मेपर्यंत वाढविण्यात आले आहे.

anews Banner

Leave A Comment