Home बुलढाणा प्रसिद्ध हवामान अंदाजक पंजाब डख यांचा शेतकरी मार्गदर्शक मेळावा अफाट संख्येने संपन्न

प्रसिद्ध हवामान अंदाजक पंजाब डख यांचा शेतकरी मार्गदर्शक मेळावा अफाट संख्येने संपन्न

54
0

आशाताई बच्छाव

IMG-20220724-WA0063.jpg

प्रसिद्ध हवामान अंदाजक पंजाब डख यांचा शेतकरी मार्गदर्शक मेळावा अफाट संख्येने संपन्न

युवा मराठा न्यूज वेब पोर्टल रवि शिरस्कार संग्रामपूर शहर

वरवट बकाल येथून जवळच असलेल्या बाल शिवाजी इंग्लिश स्कूलला लागून वानखेड फाटा वरील शिवसृष्टी मंगल कार्यालयात दिनांक 21जुलै ला UPL कंपनीच्या वतीने प्रसिद्ध हवामान अंदाजक पंजाब डख यांचा कापूस पीक मार्गदर्शन सोहळा तसेच कपाशी पीक रोगावरील रोग व कीटक नियंत्रण मार्गदर्शन कार्य प्रणाली मेळावा शेतकरी बांधवांसाठी आयोजित करण्यात आला होता , मेळावा मध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून पंजाब साहेब हे आले होते आणि यूपीएल कंपनीचे बरेचसे वरिष्ठ अधिकारी यांनी सुद्धा हजेरी लावली होती त्यामध्ये UPL कंपनीच्या साहेबांनी कंपनीने लॉन्च केलेल्या बऱ्याचशा कीटकनाशक, तननाशक, औषधांबद्दल माहिती देऊन त्यांचे शेतकऱ्याला होणारे फायदे सांगितले त्याचप्रमाणे कमी पैशांमध्ये शेतकऱ्यांचे जास्त उत्पन्न कसे निघेल याबद्दल UPL कंपनीच्या साहेबांनी मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे पंजाब डख साहेबांनी आपल्या लाडक्या शेतकऱ्यांना शेती विषयी खूप मोलाचे मार्गदर्शन केले. पाऊस कोणत्या भागात कधी आणि कसा होणार आहे, शेतकऱ्यांनी शेतीची कोणती कामे कोणत्या वेळेस करावी याचा अंदाज शेतकऱ्यांना या कार्यक्रमात दिला
संग्रामपूर तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील असंख्य शेतकरी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला व कार्यक्रम आटोपल्यानंतर शेतकऱ्यांनी पंजाब डख साहेबांना भेटून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी आपापल्या मोबाईल मध्ये पंजाब डख साहेबांसोबत उत्साहाने सेल्फी काढल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here