Home पश्चिम महाराष्ट्र जुळे सोलापुरातील महात्मा बसवेश्वर उद्यान निर्मितीसाठी समाजबांधवांची बैठक :समिती गठीत.   

जुळे सोलापुरातील महात्मा बसवेश्वर उद्यान निर्मितीसाठी समाजबांधवांची बैठक :समिती गठीत.   

79
0

राजेंद्र पाटील राऊत

जुळे सोलापुरातील महात्मा बसवेश्वर उद्यान निर्मितीसाठी समाजबांधवांची बैठक :समिती गठीत.                             युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
————–
● सोलापूर : – सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांच्या पुढाकारातून जुळे सोलापुरात साकार होत असलेल्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर उद्यानाचे भूमिपूजन करण्यासाठी नियोजनाची बैठक सात रस्ता विश्रामग्रह येथे पार पडली.
सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीत उद्यान निर्मिती समिती गठीत करण्यात आली.
जुळे सोलापूर परिसरात वसंधरा कॉलेज समोर महानगरपालिकेने जागा आरक्षित केली होती.
उमपमहापौर राजेश काळे यांच्या २४ प्रभागात हे उद्यान साकार होत आहे.
या जागेवर लिंगायत धर्म प्रसारक जगतज्योती महात्मा बसवेश्वर उद्यानास उपमहापौर काळे यांच्या भांडवली निधीतून आर्थिक तरतुद करण्यात आली आहे.
या उद्यान निर्मीतीसाठी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी व बालगोपाळ मंडळींनी पाठपुरावा करून या कामाला गती दिली .
त्यानुसार या उद्यानाचे भूमिपूजन करण्यासाठी जुळे सोलापुरातील प्रमुख समाजबांधवांची बैठक झाली
.बसवराज शास्त्री हिरेमठ,उपमहापौर राजेश काळे,ग्रामदैवत श्री शिवयोगी सिध्देश्वर महाराजांच्या यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहबू यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
यावेळी महात्मा बसवेश्वर उद्यान निर्मीती समिती गठीत करण्यात आली.
त्यामध्ये लिंगायत समाजप्रमुख सर्वश्री विजयकुमार हत्तुरे,डाॅ.बसवराज बगले,संतोष केंगनाळकर, सकलेश बाभूळगावकर,दयानंद भिमदे ,प्रदीप तडकल,
सुरेश स्वामी, डाॅ. मल्लिकार्जून तरनळी,परमेश्वर कलशेट्टी,राजेश्वरी भादूले,संपदा जोशी,शीतल जालिमिंचे,मल्लिनाथ आकळवाडी ओंकार ढेकळे व जूळे सोलापुर मधील ज्येष्ठ श्रीकांत कुलकर्णी काका आदींचा समावेश करण्यात आला.
यावेळी राजू कुराडे,बापू पाटील यांच्यासह समाज संघटनेचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
धर्मगुरूंसह लिंगायत समाजाच्या प्रमुखांना आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना आमंत्रित करून विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर सकाळी ११ वाजता या उद्यान निर्मीतीचा शुभारंभ करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

Previous articleअजमिर सौंदाणे ता.सटाणा येथे आज ग्रामसभा विविध विषयांवर चर्चा होऊन संपन्न —               
Next articleएसटी कर्मचाऱ्यांना वाली कोण? २३ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या? परिवहन मंत्र्यांनी एसटी कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे काय….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here