Home मुंबई एसटी कर्मचाऱ्यांना वाली कोण? २३ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या? परिवहन मंत्र्यांनी एसटी कामगारांना वाऱ्यावर...

एसटी कर्मचाऱ्यांना वाली कोण? २३ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या? परिवहन मंत्र्यांनी एसटी कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे काय….

1360
0

राजेंद्र पाटील राऊत

एसटी कर्मचाऱ्यांना वाली कोण? २३ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या? परिवहन मंत्र्यांनी एसटी कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे काय….

ठाणे (अंकुश पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनेल)

कामगारांना वेतन वेळेवर देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहेत. या संदर्भात आम्ही न्यायालयात जाऊन वेतन प्रदान अधिनियम कायद्यानुसार देय तारखेला वेतन द्यावे, असा आदेश प्राप्त करून घेतला आहे. आर्थिक अडचणींमुळे कामगार आत्महत्या करत असताना वेतनाची फाइल मात्र लालफितीत अडकलेली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचाही अवमान होत आहे. ही गंभीर बाब असून राज्य शासन व एसटी महामंडळाने याची दखल घ्यावी असे अध्यक्ष संदीप शिंदे, , मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटना यांनी केले आहे.

करोनामुळे मार्च २०२० पासून टाळेबंदी लागली आणि महामंडळाच्या वाहतुकीवरही निर्बंध आले. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम झाला. गेल्या वर्षी दोन महिने वेतन उशिराने झाले, तर यंदाच्या वर्षीही वेतन प्रश्न निर्माण झाला. राज्य सरकारची जरी आर्थिक मदत मिळाली असली तरीही वेळेवर वेतन मिळत नसल्याने समस्या कायम आहेत. महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२० पासून तेफेब्रुवारी २०२१ पर्यंत १२ कर्मचारी आणि मार्च २०२१ पासून ते आतापर्यंत ११ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये तर चार एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. कोल्हापूर, नागपूर, सांगली, परभणी, नाशिक, जळगाव, रत्नागिरी, लातूर विभाग, नांदेड, यवतमाळ, रायगड, सोलापूर, भंडारा, चंद्रपूर, धुळे या विभागातील एसटी कर्मचारी आहेत. यात १३ चालकांचा समावेश आहे, तर सहा वाहक, दोन साहाय्यक, एक वाहतूक नियंत्रक आणि एका लिपिकाचा समावेश आहे.
कमी वेतन व अन्य आर्थिक समस्यांमुळे मार्च २०२० पासून आतापर्यंत राज्यात २३ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एसटी महामंडळाकडून ही माहिती देण्यात आली. यात १३ चालक असून त्यानंतर वाहक व विविध विभागांतील कर्मचारी आहेत.

Previous articleजुळे सोलापुरातील महात्मा बसवेश्वर उद्यान निर्मितीसाठी समाजबांधवांची बैठक :समिती गठीत.   
Next articleश्री दत्तशिखर घाटात चार चाकी वाहनाला अपघात. १३ भाविक जखमी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here